Agriculture News in Marathi In the western part of Indapur Outbreaks of salivary glands | Page 2 ||| Agrowon

इंदापूरच्या पश्‍चिम भागात  लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्या अभावी लसीकरण मोहीम रखडली आहे. परिणामी पशुधनाला लाळ्या खुरकूतचा प्रादूर्भाव वाढला आहे.

वालचंदनगर, जि. पुणे : केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्या अभावी लसीकरण मोहीम रखडली आहे. परिणामी पशुधनाला लाळ्या खुरकूतचा प्रादूर्भाव वाढला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूतमुळे २५ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना शासकीय पशू वैद्यकिय डॉक्टरांकडून वेळेत उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. 

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय व शेळीपालनाचा व्यवसाय करतात. पश्‍चिम भागामध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लासुर्णे, बोरी, आनंदघन, निंबोडी परिसरातील शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली असल्याने शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे.

प्रादूर्भाव झालेल्या जनावरांना सुरुवातीला ताप येतो, तोंडामध्ये फोड आल्याने खात येत नाही. पायाच्या नख्याला जखम होते. जनावरांनी खाण्याचे बंद केल्यास जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. त्यामुळे जनावरे दगविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये २५पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेकडून औषधोउपचार मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जनावरांवर खासगी डॉक्टरकडून उपचार केले जात आहे. 

प्रतिक्रिया
माझ्याकडे ५० शेळ्या, ५ म्हैसी, १० रेडे, २ गाई आहेत. सर्व जनावरांना लाळ्या खुरकूतची लागण झाली होती. लाळ्या रोगामुळे शेळ्यांची पोटातील पिल्ले मेली आहेत. तसेच माझा भाऊ सतीश यांच्याकडे पाच गाई होत्या. यातील दोन गाईंचा लाळ्या खुरकूत रोगाने मृत्यू झाला आहे. सरकारी पशूवैद्यकीय दवाखान्यामध्ये हेलपाटे मारूनही डॉक्टर येत नसल्यामुळे खासगी डॉक्टराकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधल्यानंतर मला तापाची चार इंजेक्शन मिळाली आहेत. माझ्यासारखीच तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. 
- नानासाहेब गोकुळ साळुंखे, पशुपालक 

प्रतिक्रिया
लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लस शुक्रवारपासून (ता.१७) उपलब्ध होणार आहे. १ लाख ५८ हजार लसीचे डोस उपलब्ध होणार असून, तालुक्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 
डॉ. रामचंद्र शिंदे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, इंदापूर 


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनोत्तर...रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब...औरंगाबाद : ‘‘एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा...
नाशिक : मॉन्सूनोत्तर शेतकऱ्यांवर मोठे... नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील...
नळपाणी योजनांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतसांगली ः जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा...
परभणी जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’पासून सहा...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत भाग...नांदेड : ‘‘रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा,...
मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या...नांदेड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्युमुखी...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
साडेपाच लाख टन सोयापेंड  आयातीसाठी...पुणे ः केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम...
तुरीच्या पिकाकडून तूट भरून निघण्याची आशासाखरखेर्डा, जि. बुलडाणा ः यंदा या परिसरात तुरीचे...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...