नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपावर ओल्या दुष्काळाचे सावट

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपावर ओल्या दुष्काळाचे सावट
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपावर ओल्या दुष्काळाचे सावट

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांपर्यंत पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. यंदाची दिवाळी पावसाळी वातावरणातच साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४९ पैकी १४७ मंडळांमध्ये मंगळवारी (ता. २५) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, परभणी जिल्ह्यांतील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात सर्वाधिक १९१ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्व ८० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड तालुक्यातील वसरणी, भोकर तालुक्यांतील मोगाली, लोहा तालुक्यांतील माळाकोळी, मुखेड तालुक्यांतील जाहूर, बाऱ्हाळी या पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात सर्वाधिक १३४ मिलिमीटर पाऊस झाला.

परभणीत सर्व ३९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव, चिकलठाणा, मानवत तालुक्यांतील कोल्हा, मानवत, केकरजवळा, पाथरी तालुक्यांतील हदगाव, पाथरी, बाभळगाव, सोनपेठ तालुक्यांतील सोनपेठ, पालम तालुक्यातील बनवस या दहा मंडाळामध्ये अतिवृष्टी झाली. देऊळगावात सर्वाधिक १९१ मिलिमीटर पाऊस झाला. बनवसमध्ये अतिवृष्टीमुळे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क काहीकाळ तुटला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (३५ मि.मींच्या पुढे )ः 

नांदेड जिल्हा नांदेड शहर ४५, विष्णुपुरी ५०, वसरणी ७०, वजीराबाद ४६, दाभड ३८,मोगाली ७०, मातुल ५०, उमरी ३९, जारिकोट ४७,  जांब ४८, येवती ५०, जाहूर ६८, मुक्रामबाद ३६, बाऱ्हाळी १३४, कंधार ३५, कुरुला ४२, उस्माननगर ३५, लोहा ५७, माळाकोळी ७७, सोनखेड ४४, कापशी ५८.
परभणी जिल्हा झरी ५०, पेडगाव ४८, जांब ४२, सावंगी म्हाळसा ३७, बोरी ५६, आडगाव ४५, बामणी ६०, देऊळगाव १९१, कुपटा ३८, चिकलठाणा ७३, मानवत ९०, केकरजवळा ७८, कोल्हा ६५, पाथरी ८१, बाभळगाव ८०, हदगाव ८९, राणीसावरगाव ३५, पालम ५५, चाटोरी ४२, बनवस ६५, चुडावा ३५.
हिंगोली जिल्हा कळमनुरी ४८, आजेगाव ३६, साखरा ४५, पानकनेगाव ३९, कुरुंदा ६३, साळणा ३८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com