Agriculture News in Marathi Wet drought in Nagpur Demand to declare | Page 2 ||| Agrowon

नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे.

नागपूर : सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. अति पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. 

नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यात मॉन्सून व पर्जन्यमानाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून दिली. खासदार तुमाने म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सर्वांत कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र या वेळी या दोन्ही तालुक्यांत आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. या शिवाय हिंगणा, कळमेश्‍वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यांत ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित ६ पैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या ४ तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे.

शासकीय निकषानुसार ज्या तालुक्यात ११० मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशा तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडतो. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरी १०६४.१ मिमी. तर सप्टेंबरअखेर पर्यंत १०१.०१ टक्के सरासरी ९२०.४ मिमी. पाऊस पडतो. परंतु या वर्षी जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंतच १०८.२७ टक्के ९२९.७ मिमी. पाऊस झाला आहे. तब्बल ७ तालुक्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.’’ 

पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत 
जिल्ह्यात २,१०,९४४ हेक्टर कापूस, ९२,७६४ हेक्टर सोयाबीन, ६३,९१७ हेक्टर तुरीची, तर ९३,८२१ हेक्टरवर धानाची लागवड झाली होती. तसेच हजारो हेक्टर संत्रा व मोसंबीचे पीक आहे. मागील २० दिवसांत सुमारे ३०० मिमी. पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे.

 अनेक गावांत अतिवृष्टी 
जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. नरखेड तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संत्रा पिकावर विविध रोग आले आहेत. रामटेक तालुक्यात अनेक गावांत अधिकचा पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मात्र जिल्हा प्रशासन पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी पुन्हा उघड्यावर शक्यता आहे.


इतर बातम्या
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...
पंढरपुरात दीडशे विकास सेवा...सोलापूर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या...
वर्धा जिल्ह्यात तुषार सिंचनाचा १ हजार...वर्धा ः ‘‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत...
मराठवाड्यात २ लाख १२ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
नाशिक : फसवणूक झाल्यास समितीकडे तक्रार...नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...
खानदेशात गारव्यामुळे पशुधन मृत्युमुखी नंदुरबार : सलग तीन दिवस मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या...
‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयारपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा...
नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या...
देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादनकोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला...
बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची...
कृषी शिक्षणाचा टक्का घसरलापुणे ः राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा गाडा...
राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची...पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी...
राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार...सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व...
पाऊस, गारठ्याने नगरमध्ये  सातशे चौदा...नगर ः नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ...
पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला...पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि...