Agriculture News in Marathi Wet drought in Nagpur Demand to declare | Agrowon

नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे.

नागपूर : सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. अति पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. 

नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यात मॉन्सून व पर्जन्यमानाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून दिली. खासदार तुमाने म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सर्वांत कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र या वेळी या दोन्ही तालुक्यांत आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. या शिवाय हिंगणा, कळमेश्‍वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यांत ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित ६ पैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या ४ तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे.

शासकीय निकषानुसार ज्या तालुक्यात ११० मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशा तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडतो. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरी १०६४.१ मिमी. तर सप्टेंबरअखेर पर्यंत १०१.०१ टक्के सरासरी ९२०.४ मिमी. पाऊस पडतो. परंतु या वर्षी जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंतच १०८.२७ टक्के ९२९.७ मिमी. पाऊस झाला आहे. तब्बल ७ तालुक्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.’’ 

पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत 
जिल्ह्यात २,१०,९४४ हेक्टर कापूस, ९२,७६४ हेक्टर सोयाबीन, ६३,९१७ हेक्टर तुरीची, तर ९३,८२१ हेक्टरवर धानाची लागवड झाली होती. तसेच हजारो हेक्टर संत्रा व मोसंबीचे पीक आहे. मागील २० दिवसांत सुमारे ३०० मिमी. पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे.

 अनेक गावांत अतिवृष्टी 
जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. नरखेड तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संत्रा पिकावर विविध रोग आले आहेत. रामटेक तालुक्यात अनेक गावांत अधिकचा पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मात्र जिल्हा प्रशासन पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी पुन्हा उघड्यावर शक्यता आहे.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...