Agriculture news in marathi Wet drought in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत गेल्या १० -१५ दिवसांहून अधिक कालावधीपासून सतत पाऊस सुरु आहे.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत गेल्या १० -१५ दिवसांहून अधिक कालावधीपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. ओढे, नाले, नदीकाठच्या जमिनी चिभडल्या आहेत.

अतिवृष्टी झालेल्या भागात जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतरस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतुकाचा प्रश्न गंभीर आहे. पाऊस थांबला नाहीतर नुकसानीच्या प्रमाणात आणखीन वाढ होऊ शकते. खरिप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. कृषी विभाग, विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी करुन पीकविमा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

दोन्ही जिल्ह्यात सोयाबीनसह तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर कपाशी, ज्वारी, उडीद, बाजरी, तीळ या पिकांचा क्रम लागतो. पावसाचा सर्वाधिक फटका काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकाला बसला. शेंगांना झाडावरच मोड फुटले आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. काही बोंडे फुटून कापूस वेचणीस आला आहे. परंतु, पावसात भिजल्याने कापसातील सरकीला मोड फुटले आहेत. 

पाथरी, मानवत, सेलू , जिंतूर, औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी तालुक्यात अनेक मंडळांत सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहिला. 

पाथरी मंडळात मोठी पीकहानी झाली. शेत रस्त्यांची दुरवस्था आहे. कपाशीची वाढ खुंटली आहे. बोंडसड झाली आहे. उडीद, तीळ पिकाला मोड फुटले आहेत. ऊस आडवा झाला आहे. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करुन सर्वच पिकांच्या विमा परतावा द्यावा. विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. 
- ज्ञानेश्वर काळे, शेतकरी, चाटे पिंपळगाव,जि.परभणी

गेल्या आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे विहिरी भरल्या आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. सोयाबीनला मोड फुटत आहेत. पीक हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.
- माणिकराव सुर्यवंशी, शेतकरी सिंगणापूर, जि.परभणी


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...