agriculture news in marathi For wet drought in Parbhani Stop the way of the Farmers Struggle Committee | Agrowon

परभणीत ओला दुष्काळासाठी शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

परभणी :‘‘जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे  बुधवारी (ता.४) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी :‘‘जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे  बुधवारी (ता.४) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास येत्या काळात  तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा  प्रशासनास देण्यात आला.

परतीच्या पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास पाच ते सहा दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह विक्रमी पावसाने हिरावून नेला. शासनाने मोजकीच मंडळे समाविष्ट न करता संबंध जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा. पीक विमा परतावा मंजूर करावा. योग्य नियोजन करुन पणन महासंघ तसेच सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरु करावी. या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे पोखर्णी फाटा, त्रिधारा फाटा, टाकळी कुंभकर्ण, पेडगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला.

यामुळे परभणी-जिंतूर, परभणी -गंगाखेड, परभणी- पाथरी, परभणी -वसमत या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, माऊली कदम, अंतराव कदम, संतोष देशमुख, डॉ. धर्मराज चव्हाण, सचिन जवंजाळ, ज्ञानोबा जोगदंड, किरण चक्रपाणी, विजय खिस्ते,  प्रभाकर शिंदे, नृसिंह ढेबरे, लहुजी शेळके, माधव शेळके, सुरेश हरकळ आदीसह शेतकरी सहभागी झाले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...