agriculture news in Marathi wet drought trend on social media Maharashtra | Agrowon

सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

 राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शासनाने लक्ष वेधावे यासाठी नांदेड, सोलापूर, नगर, सातारा या जिल्ह्यांतील सामाजिक माध्यमात (सोशल मिडीया) ॲक्टीव असलेल्या शेतकरी पुत्रांनी ‘#ओला_दुष्काळ’ असा ग्रुप तयार केला. यानंतर ‘ट्वीटर, फेसबुक व व्हट्सॲप’च्या माध्यमातून ट्रेंड सुरु झाला. यात राज्यातील हजारो नागरिकांसह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे भाई जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी ट्रेंडला टॅग करुन संदेश पाठविला.

राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेले मुग, उडीद त्यावेळच्या पावसाने गेले. यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने कहरच केला. यात सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या हंगामी पिकासह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी राज्यातून होवू लागली. परंतु शासनाकडून ठोस निर्णय होत नव्हता. 

शासनाचे लक्ष वेधावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष गव्हाणे, सोलापूरचे ब्रम्हा चटे यांनी प्रथम ‘#ओला_दुष्काळ’ असा टॅग ग्रुप तयार केला. यानंतर साताराचे प्रदीप कणसे, नगरचे संग्राम देशमुख, बारामतीचे अनिल माने अशा शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन यात भाग घेतला. यानंतर ‘ट्वीटर, फेसबुक व व्हट्सअप’च्या माध्यमातून ट्रेंड तयार झाला. यात राज्यातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. हा ट्रेंड लक्षवेधी ठरल्याने माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड आदींनी ट्रेंडला टॅग करुन संदेश पाठविला.

प्रतिक्रिया
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, याकरिता सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘#ओला_दुष्काळ’ असा टॅग ग्रुप तयार केला. याला राज्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
- संतोष गव्हाणे, प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नांदेड.


इतर अॅग्रो विशेष
शेतीतील नवी ‘ऊर्जा’पेट्रोलियम मंत्रालयाने थेट देशातील साखर...
आता इंधनालाही बांबूचा आधारगेल्या काही दशकांत पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात...
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...
रस्त्यानेच रोखली संत्रा प्रक्रिया...अमरावती : अवघ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याने...
सांगलीत द्राक्ष हंगाम रोगांच्या विळख्यातसांगली :  द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून...
राज्यात फळबाग लागवडीचा उच्चांकपुणे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...
कोकणातील कातळावर ड्रॅगनफ्रूटपूर्णगड (ता. जि. रत्नागिरी) येथील डॉ. श्रीराम...
देशमुखांची फळबागकेंद्रित प्रयोगशील शेती झरी (ता. जि. परभणी) येथील कृषिभूषण सूर्यकांतराव...
‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीसाठी समिती; ‘...मुंबई : जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी...
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...