गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर करा

भडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. खर्च व मेहनतही वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणारे घटक प्रचंड हवालदिल झाले आहेत.
Wet in the mill belt Declare a famine
Wet in the mill belt Declare a famine

भडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. खर्च व मेहनतही वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणारे घटक प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेल्या पीकपेऱ्यानुसार तत्काळ रोख स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी भडगाव तालुका भाजप, पाचोरा राष्ट्रवादी यांसह गिरणा पट्ट्यातील विविध संघटना, शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

भडगाव तालुका भाजपतर्फे तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या बाबत तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई मिळण्याकामी शासनाकडे तत्काळ मागणी करावी. यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या भरपाईची मदतही तत्काळ मिळावी.

तालुक्यात झालेल्या रस्तानिर्मितीमुळे संबंधित विभागाने सांडवा न काढल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी तुंबले. त्यामुळे पूर्ण पीक वाया गेले. शेताचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे करावेत. या प्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण लिंडायत आदी उपस्थित होते. भडगाव तालुक्यात शासनाने भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच संघाच्या वतीने करण्यात आली. 

सरसकट मदतीची मागणी 

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी दिलीप वाघ, संजय वाघ, नितीन तावडे, खलिल देशमुख, विकास पाटील, सतीश चौधरी, रणजित पाटील, अशोक मोरे, भगवान मिस्तरी, प्रकाश पाटील, सुदर्शन सोनवणे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com