Agriculture news in marathi Wet rain for three days in Khandesh | Agrowon

खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

जळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत झाली आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे.

जळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत झाली आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, पारोळा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भडगाव, चाळीसगाव, असा सर्वत्र पाऊस झाला आहे. धुळ्यातही साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाला. तर, नंदुरबारात सातपुड्यातील अक्कलकुवा, धडगाव येथेही पाऊस झाला. नवापूर, तळोदा, शहादा व नंदुरबारातही पाऊस झाला. सातपुड्यातील उदय नदीला चांगले प्रवाही पाणी आले आहे.  तळोदा भागातून जाणाऱ्या खरडी नदीलाही चांगले प्रवाही पाणी आहे. तर, सातपुड्यातून येणारी सुसरी, गोमाई नदीदेखील प्रवाही आहे. कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. 

भिज पावसामुळे जमिनीत पाणी मुरत आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६५ टक्के, धुळ्यात ६७ टक्के, तर नंदुरबारातही ६८ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. यातील ४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 

मनुदेवीतील धबधबा  प्रवाही 

सातपुडा पर्वतातील यावलमधील मनुदेवी येथील धबधबा  प्रवाही झाला आहे. तर, चाळीसगावमधील पाटणादेवी भागातील धवलतीर्थ धबधबादेखील प्रवाही आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाऊस चोपडा तालुक्यात झाला आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही १८ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धडगाव येथे ४५ मिलीमीटर पाऊस झाला, अशी माहिती मिळाली. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...