agriculture news in marathi Wet Turmeric can be in powder form in twenty four hours | Page 2 ||| Agrowon

ओल्या हळदीपासून २४ तासांत पावडर

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद येथील सुशील सर्जेराव शेळके यांच्या ‘एस ४ फूड्स’साठी ‘ॲग्री इंडिया हॅकाथॉन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटात पुरस्कार जाहीर झाला आहे.  

अकोला ः औरंगाबाद येथील सुशील सर्जेराव शेळके यांच्या ‘एस ४ फूड्स’साठी ‘ॲग्री इंडिया हॅकाथॉन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटात पुरस्कार जाहीर झाला आहे.  

ॲग्री इंडिया हॅकाथॉन स्पर्धेत पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सहा हजार स्टार्टअप सहभागी होते. त्यातून दुसऱ्या फेरीत २०० स्टार्टअप पोहोचले, तर तिसऱ्या फेरीत पोचलेल्या ६० स्टार्टअप पैकी २४ स्टार्टअपची निवड करण्यात आली. या २४ स्टार्टअपमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटामध्ये फुलंब्री, जि. औरंगाबाद येथील एस. ४ फूड्‍सचे संचालक सुशील शेळके यांचा समावेश आहे.

पुसा कृषी, आयएआरआय यांच्या मार्फत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत या विजेत्यांना एक लाख रुपये पुरस्कार दिला जाणार आहे. सोबतच या स्टार्टअपच्या वाढीसाठी इनक्युबेटर प्रक्रिया आणि उद्योग विकासाच्या अन्य बाबींसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे साह्य वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. संजय भोयर व सहकारी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ओल्या हळदीपासून २४ तासांमध्ये काप किंवा भुकटी बनवण्याच्या तंत्रज्ञानावर आधरित हा उद्योग आहे. शेतीमाल संशोधन केंद्रामध्ये विकसित या तंत्रज्ञानाला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्यामुळे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, संशोधकांचे मनोबल उंचावले आहे.  

प्रतिक्रिया...
२०१४-१५ मध्ये करार करून सदर तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर २०१७ मध्ये औरंगाबादमध्ये डॉ. संजय भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग सुरू केला. दोन हंगाम पूर्ण क्षमतेने उद्योग चालवत असून, यंदा तिसरा हंगाम सुरू आहे. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाकडे अनुदानासाठी केलेला अर्ज केवळ तांत्रिक कारणामुळे फेटाळला गेला होता. मात्र या स्पर्धेतील पुरस्कारामुळे आनंद झाला आहे. 
- सुशील शेळके, ८०८७१४६६५४

पारंपरिक हळद प्रक्रियेमध्ये बॉयलरमध्ये हळद शिजवून पुढे सूर्यप्रकाशात १५ ते २० दिवस वाळवली जाते. परिणामी, त्यातील कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. नव्या तंत्रज्ञानामध्ये स्वच्छ केलेल्या हळदीचे काप वाफेशी प्रत्यक्ष संपर्क येऊ न देता प्रक्रिया केली जाते. त्यानंतर नियंत्रित तापमानात ड्रायरमध्ये वाळवले जाते. त्यानंतर त्याची भुकटी केली जाते. ओली हळद ते भुकटी ही प्रक्रिया केवळ २४ तासांत पार पडते. या प्रक्रियेद्वारे तयार भुकटीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४ ते ६ टक्क्यांपर्यंत राहते. 
- डॉ. संजय भोयर, ९९२१९५८९९९
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...