खंडित केलेल्या कृषिपंपाच्या जोडणीचे काय?

नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात चर्चा केल्याशिवाय कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश काढले.
What about the connection of the disconnected agricultural pump?
What about the connection of the disconnected agricultural pump?

नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात चर्चा केल्याशिवाय कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश काढले. परंतु राज्यात नव्वद टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे ७५ टक्के बिल वसुली करून वीजपुरवठा खंडित केला आहे. या खंडित कृषिपंपाच्या जोडणीचे काय? असा प्रश्‍न शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केला आहे.

कृषिपंपाची वीजबिल वसुली मोहीम जोरात असतानाच विरोधी पक्षाने धारेवर धरल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी नुकतेच बिलाच्या वसूलीसाठी वीज पुरवठा तोडू नये, असे आदेश काढले आहेत.

परंतु महावितरणने आतापर्यंत ९० टक्के पंपांचा वीज पुरवठा खंडित करून ७५ टक्के वसुली केली आहे. खंडित केलेला वीज पुरवठा बिल वसुली झाल्याशिवाय परत जोडण्याबाबत आदेश नाहीत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणने कृषिपंपाच्या वीजबिल वसुलीचा धडाका संपूर्ण राज्यभरात सुरू केला आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना घटवून वीजबिल भरण्याबाबत सूचना सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर लगेच त्यांनी शेतात जाऊन मुख्य वीज वाहिनीची वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे रोहित्राचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवाही बंद झाल्या आहेत.

विरोधी पक्षाने विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रश्नावरून धारेवर धरल्यामुळे शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजपुरवठा खंडित करू नये असे आदेश काढले. परंतु तो पर्यंत नव्वद पंच्याण्णव टक्के पर्यंत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

अनेकांकडून चार हजार ते पाच हजार रुपये वीज बिलापोटी वसूल करण्यात आला. वास्तविक सात हजार किंवा आठ हजार वार्षिक बिल असेल तर त्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे एक तृतीयांश पेक्षा जास्त वसुली करता येत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com