agriculture news in marathi, What crop should we now take away from the rain? | Agrowon

पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे? शेतकऱ्यांची चिंता

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल करावे लागणार आहे. मात्र, आता पाऊस आल्यावर कोणत्या पिकांची पेरणी, लागवड करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असताना कृषी विभागाकडूनही जिल्ह्यातील शेतकरी बेदखल झाल्यासारखी स्थिती आहे. दुष्काळी स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठांनी आदेश देऊनही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. 

नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल करावे लागणार आहे. मात्र, आता पाऊस आल्यावर कोणत्या पिकांची पेरणी, लागवड करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असताना कृषी विभागाकडूनही जिल्ह्यातील शेतकरी बेदखल झाल्यासारखी स्थिती आहे. दुष्काळी स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठांनी आदेश देऊनही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. 

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दुष्काळाने शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नसल्याने छावण्यांमध्ये जनावरे जगवावी लागत आहेत. त्यामुळे आता शेतीबाबत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, दुष्काळी स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे शासन स्तरावरूनच आदेश दिले गेले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाचे कान टोचले.

मात्र, तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दखल घ्यावी वाटली नाही हेच सध्याच्या स्थितीतून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील नगर, पारनेरच्या काही भागांत खरिपात मूग, उडीदाचे क्षेत्र अधिक असते. काही भागांत बाजरी, तुरीची पेरणी होते. कापसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी वाढत आहे. साधारण दहा जूनपर्यंत चांगला पाऊस झाला तर उडीद, मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. आता मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस उलटूनही पाऊस नाही. त्यामुळे आता जेव्हा चांगला पेरणीयोग्य पाऊस होईल तेव्हाच पेरण्या, लागवडीला सुरवात होईल. मात्र, पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

तपासणीचे काय झाले?
जिल्ह्यात गेल्यावर्षी पाऊस नव्हता. त्यामुळे बियाणे, कीटकनाशके व खते शिल्लक राहिली. जुन्याच मुदतबाह्य कीटकनाशकांवर नवीन शिक्के लावून विक्री केली जात असल्याचा प्रकार महिनाभरानंतर उघड झाला. त्यानंतर संभाजी बिग्रेडच्या मागणीनुसार जिल्ह्यात तपासणी केल्यावर कोट्यवधी रुपयांची कीटकनाशके मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. हीच कीटनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जात होती. मुळात कृषी विभागाच्या नियमित तपासणीत याबाबी स्पष्ट व्हायला पाहिजे होत्या. मात्र कृषी विभागाकडून होणारी तपासणी फक्त कागदावर होत असल्याचे दिसून आले. आता त्या वेळी झालेल्या तपासणीचे काय झाले? याची माहिती कृषी विभागाकडून मिळत नाही.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...
सांगली बाजार समितीतील सौदे राहणार चार...सांगली ः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात...
पाचोरा बाजार समितीत लिलाव बंदजळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर...
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा...मंगळवेढा, जि. सोलापूर  ः पंतप्रधान पीक विमा...
नागपुरात सोयाबीन क्षेत्रात १२ हजार...नागपूर : कापूस शेतीत मजुरांची तसेच विक्रीत...
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १६.६० टक्केच...परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी...
परभणी जिल्ह्यात गरजेवेळी युरियाचा तुटवडापरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया...
शेतकऱ्यांनो, सेंद्रिय शेतीकडे वळा ः...परभणी : ‘‘अनेक पिकांचे देशी वाण मानवासाठी...
`व्हर्च्युअल गॅलक्‍सी'च्या देणेबाकीवर,...सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास...मुंबई  : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी...