कंपन्यांनी लॉबिंग करुन मालाचे भाव पाडल्यास काय करायचे ः रविकांत तुपकर

केंद्राने पारीत केलेल्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. जर कंपन्यांनी लॉबिंग करुन शेतमालाचे दर पाडले तर काय करायचे, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला.
What to do if companies lobby and lower prices: Ravikant Tupkar
What to do if companies lobby and lower prices: Ravikant Tupkar

बुलडाणा ः केंद्राने पारीत केलेल्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. जर कंपन्यांनी लॉबिंग करुन शेतमालाचे दर पाडले तर काय करायचे, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी नेत्यांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सींग’द्वारे मते जाणून घेतली. यात तुपकर यांनीही बुलडाणा येथून सहभाग घेतला. या कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या प्रतिनिधींची समिती गठित करुन शिफारशी मागवणे गरजेचे होते, असे सांगत त्यांनी कृषी विधेयक बहुमताच्या बळावर पारीत करुन केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यापासून पळ काढत आहे, असा आरोप केला.

शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दारात उभा करणारा हा कायदा असून यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिल्या गेले नाही. वीज व पाणी या पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याची प्राथमिकता केंद्र सरकारची हवी, भारतीय शेतकऱ्यांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्याचे धोरण हवे. परंतु यावर कृषी विधेयकात भर न देता कंपन्यांचे आमिष दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे.

या कायद्यानुसार शेतीमालाचे भाव पडले तर सरकार हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे घामातून तयार झालेला शेतमाल प्रसंगी शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागेल. जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तरतूद आहे, पण उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भातील कायद्याचा अभ्यास आहे का? यावरही तुपकर यांनी बोट ठेवत आक्षेप घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com