Agriculture news in Marathi What to do with small orange fruit? | Agrowon

लहान संत्रा फळांचे करायचे काय?

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड येथील खासगी कंपनीकडून प्रक्रिया होत असल्याने आतापर्यंत अशा फळांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निकाली निघत होता. यंदाच्या हंगामात मात्र कंपनीने अशा फळांची खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड येथील खासगी कंपनीकडून प्रक्रिया होत असल्याने आतापर्यंत अशा फळांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निकाली निघत होता. यंदाच्या हंगामात मात्र कंपनीने अशा फळांची खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भात प्रस्तावित संत्रा प्रक्रिया उद्योग तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावामुळे नांदेड येथे पळविण्यात आला होता. हा प्रकल्प पुढे कार्यान्वित झाल्यानंतर त्याकरिता लागणाऱ्या लहान आकाराच्या फळांची खरेदी विदर्भातून होत होती. गेल्या वर्षी देखील या प्रकल्पाकरिता विदर्भातून लहान आकाराच्या फळांची खरेदी झाली. ५० एम.एम. आकाराचे या फळांना बाजारपेठेत मागणी राहत नाही. 

त्यामुळे नाइलाजाने ही चुरी फळे शेताच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागतात. यंदा मात्र नांदेड येथील प्रक्रिया उद्योजकाने लहान आकाराची ही फळे खरेदीस नकार दिला आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात अशा फळांचे करावे तरी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने अशा प्रकारचा निर्णय का घेतला, याबाबत देखील स्थानिक संत्रा उत्पादकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. 

नांदेड येथील प्रकल्प अडचणींमुळे बंद
नांदेड येथील एका खासगी कंपनीकडून दररोज सुमारे २५० ते ३०० टन लहान आकाराच्या फळांची खरेदी होते. कंपनीद्वारे अशा फळांवर प्रोसेसिंग केले जाते. हंगामात ३० ते ३५ हजार टन संत्रा कंपनी खरेदी करत असल्याने संत्रा बाजार स्थिर राहण्यास मदत होत असल्याची माहिती विदर्भातील संत्रा उत्पादकांनी दिली. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी देखील काही अडचणींमुळे प्रकल्प बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले.

राज्यातील संत्रा बागायती क्षेत्र

  • संत्रा लागवड : एक लाख ५० हजार हेक्टर
  • एकूण उत्पादन : सात लाख ४२ हजार टन
  • सरासरी उत्पादकता : ५.५ टन
  • लहान आकाराची फळे : एकूण उत्पादनाच्या ३० टक्के

शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करून संत्रा उत्पादकांच्या हितासाठी या प्रकल्पाला फळांचा पुरवठा सुरळीत राहावा याकरिता व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करून संत्रा उत्पादकांच्या हितासाठी या प्रकल्पाला फळांचा पुरवठा सुरळीत राहावा याकरिता व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज


इतर अॅग्रो विशेष
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...