नगर : भरलेल्या पीक विमा हप्त्याचे काय झाले?

गेल्या वर्षी दुष्काळाने लोकांची होरपळ झाली. शेतीत काहीच पिकले नाही. तरीही लोकांनी विमा भरून भरपाई दिली जात नाही. कृषी विभागाला याबाबत माहिती देता येत नाही. ‘‘तुम्ही कंपनीशी थेट बोला’’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. असे असेल तर कृषी विभागाची गरज काय? त्यांच्या कारभारावर शंका येईल, अशी स्थिती आहे. - शरद मरकड,तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना, पाथर्डी, जि. नगर
भरलेल्या पीक विमा हप्त्याचे काय झाले?
भरलेल्या पीक विमा हप्त्याचे काय झाले?

नगर : नैसर्गिक अपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला. विमा हप्तापोटी रक्कमही भरली. मात्र त्यानंतर पुढे काय झाले? याची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागात चकरा सुरू आहेत. मात्र कृषी विभागालाच त्याबाबत माहिती नाही. ‘‘आम्ही भरलेल्या हप्ताचे काय झाले, आम्हाला कोण माहिती देईल’’ असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतकरी कृषी विभागाच्या कारभारावर संतापले असून विमा योजनेबाबत तक्रारीही दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. 

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात ३ लाख ४९ हजार ५४४ शेतकऱ्यांनी २ लाख ६९ हजार २४६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. त्यापैकी २ लाख ३६ हजार ७८५ शेतकऱ्यांना खरिपाचा विमा मिळाला. म्हणजे १ लाख १२ हजार ७५९ शेतकरी खरिपात विमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शिवाय हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतून २०१८-१९ मध्ये मृगबहार व आंबिया बहारात ६२ हजार ०२९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यातील आतापर्यंत २०१८-१९ मधील मृगबहारमधील १५४४४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीचा विचार करता अजून पंचेचाळीस हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

आंबिया बहाराची माहिती यायची आहे. पन्नास टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. यंदा जिल्ह्याच्या सर्वच भागात गंभीर दुष्काळ होता. गेल्या वर्षी खरिपात ८० टक्के पिके वाया गेली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com