तूर खरेदीची मर्यादा किती?

नाफेडतर्फे हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही. केवळ खरेदीची मर्यादा किती आहे, अशी चौकशी करून जात असल्याचे चित्र आहे.
तूर खरेदीची मर्यादा किती? What is the limit for buying tires?
तूर खरेदीची मर्यादा किती? What is the limit for buying tires?

सांगली : नाफेडतर्फे हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी केली नाही. केवळ खरेदीची मर्यादा किती आहे, अशी चौकशी करून जात असल्याचे चित्र आहे. मर्यादेची अट रद्द करावी, अशी दर वर्षी मागणी केली जाते. परंतु मर्यादेची अट रद्द केली जात नाही आणि मर्यादाही वाढवली जात नाही. त्यामुळे दरवर्षी तूर खरेदीचा प्रश्न गुंतागुंतीचा होऊ लागला आहे.

 सांगली जिल्ह्यात खरीप हंगामात १० हजार ४५५ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ , खानापूर, तासगाव तालुक्यांत तुरीचे उत्पादन घेतले जाते.  जत तालुक्यात ७ हजार ७५१ हेक्टरवर तुरीचा सर्वाधिक पेरा होतो. दुष्काळी पट्ट्यातील बहुतांश ठिकाणी तुरीचा आगाप पेरा केला जातो. परंतु यंदा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पाऊस असल्याने आगाप तूर पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. सध्या एकरी अडीच क्विंटल उत्पादन मिळाले आहे. तर दुष्काळी भागासह अन्य ठिकाणी तुरीची उशिरा पेरणी केली जाते. त्या ठिकाणी हा पाऊस पिकास उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे उत्पादनात किंचित वाढ झाली असून, एकरी चार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या हाती आले आहे.

तूर पिके हे संपूर्ण पावसावर अवलंबून आहे. कमी अधिक पाऊस झाला तर त्याचा फटका उत्पादनावर बसला जातो. हे खरे असले तरी हमीभावाने खरेदी करण्यासाठी तुरीची मर्यादा ठरवली जाते. परंतु ही मर्यादा कोणत्या आधारावर ठरवतात, त्याचे कोडे शेतकऱ्यांना अद्यापही सुटलेले नसल्याचे दिसते आहे. सध्या हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. परंतु नोंदणीसाठी शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. खरेदी केंद्रात येऊन केवळ तूर खरेदीची मर्यादा किती आहे, हाच प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मात्र, खरेदीची मर्यादा अद्यापही विभागाकडून आलेली नाही. त्यामुळे शेतकरी हेलपाटेच मारत आहे.

गतवर्षी तूर खरेदी सुरू झाली, खरेदीची मर्यादा होती ती फक्त हेक्टरी २५७ किलोची. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. सुमारे नऊ दिवस शेतकरी बाजार समितीत ठाण मांडून बसले होते. खरेदीवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तुरीची उत्पादकता वाढली असल्याची चर्चा कबुली पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली होती. परंतु खरेदीची मर्यादा वाढवली नाही. तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असली तरी, यंदा हेक्टरी किती तुरीची मर्यादा असणार आहे. या बाबत अद्यापही कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे. त्यामुळे तूर खरेदी केंद्रावर यंदाही गतवर्षीप्रमाणे  शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे.

प्रतिक्रिया

माझी ३० पोती तूर आहे. खरेदी केंद्र सांगली येथे आहे. आमच्या गावापासून केंद्र १२० ते १५० किलोमीटरवर आहे. त्यातच पुन्हा खरेदीची मर्यादा घातली आहे. त्यामुळे घेऊन जाणे परवडत नाही. जेवढ्या तुरीचे उत्पादन मिळाले आहे, तेवढी तूर खरेदी करायला हवी, त्यासाठी खरेदीची मर्यादा कशासाठी घातली आहे. मर्यादेची अट रद्द करावी. -रोहिदास सातपुते ,  उमदी, ता. जत. तूर उत्पादक शेतकरी

खरेदीची मर्यादा हेक्टरी वर्षनिहाय     २०१७-१८    १० क्विंटल २०१८-१९    ४९६ किलो २०१९-२०    २५७ किलो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com