agriculture news in Marathi what will be spray on Moong crop Maharashtra | Agrowon

मुगावर काय फवारायचे?

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख असलेल्या मुगाच्या पिकावर यंदाच्या हंगामात किडीरोगांचा प्रादुर्भाव झालेला असून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केल्यावरही कीड नियंत्रणात आलेली नाही.

अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख असलेल्या मुगाच्या पिकावर यंदाच्या हंगामात किडीरोगांचा प्रादुर्भाव झालेला असून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केल्यावरही कीड नियंत्रणात आलेली नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी पिकावर नांगरही फिरवला. मुगावर आलेल्या किडीच्या अनुषंगाने कीडनाशकांचे फार कमी किंवा मर्यादित लेबल क्लेम असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. परिणामी फवारणीसाठी एखाद्या कीटकनाशकाबाबत स्पष्ट सल्ला दिला जात नाही. संदर्भीय कीटकनाशक फवारून बघा एवढाच सल्ला दिला जात आहे. 

यंदाच्या हंगामात मुगावर मावा, तुडतुडे, लाल कोळी, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे काही विशिष्ट वाणांचे हे पीक पूर्णतः उध्वस्त झाले. पीक नुकसान  मोठे असल्याने शेतकऱ्यांना काहीही करता आलेले नाही. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कीडनाशकांच्या दोन ते तीन फवारण्या केल्या. परंतु काहीही फायदा होत नसल्याने नांगर फिरवला. तेल्हारा, बाळापूर, अकोट व इतरही तालुक्यात मुगाच्या शेकडो हेक्टरमधील पिकावर हा प्रादुर्भाव झालेला आहे.

मुगाचे राज्याचे क्षेत्र सरासरी ४ लाख ८३ हजार हेक्टर आहे. यंदा ३ लाख हेक्टरच्या आत पेरणी  झालेली आहे. एकट्या अमरावती विभागात मुगाचे ४५हजारांपर्यंत क्षेत्र आहे.  नाशिक, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती या पाच विभागांमध्ये मुगाचे क्षेत्र सरासरी प्रत्येकी ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवडीखाली आलेले आहे.

कीटकनाशकाची शिफारसच नाही
मुगाच्या पिकाचे क्षेत्र कमी राहत असल्याने या पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत कमी किंवा मर्यादित कीडनाशकांचे लेबल क्लेम्स आहेत. मावा, तुडतुडे, लाल कोळी, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी  कपाशीसारख्या पिकात लेबल क्लेम उपलब्ध आहेत. परंतु मूग पिकाबाबत अडचण तयार झालेली आहे. यामुळे शेतकरी अन्य पिकांवर संबंधित किडींसाठी असलेल्या कीटकनाशकांचा संदर्भ घेऊन मुगावर फवारणी करीत आहेत. तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुगावरील व्हायरसच्या प्रादुर्भावाचे नमुने घेत कृषी विद्यापीठाच्या चमूने काढून बंगलोर येथे तपासणीला पाठवले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतर या प्रादुर्भावाची कारणे कळू शकणार आहेत. बियाण्यातच दोष होता का, हेसुद्धा या अहवालातून समजू शकेल. 

प्रतिक्रिया
मुगावर आलेल्या या किडीच्या अनुषंगाने मी तीन फवारण्या घेतल्या. एकरी तीन हजारांचा हा खर्च झाला. एवढे करूनही पीक सुधारले नाही. त्यामुळे त्यावर ट्रॅक्टर फिरवला. बी- बियाणे, खते, फवारणी, मशागत यावर झालेला खर्च तसाच गेला. आता दोन महिने शेत तसेच पडून राहील. रब्बीत त्यात हरभऱ्याचे नियोजन करावे लागेल. 
-नितीन देठे, मूग उत्पादक, तेल्हारा जि. अकोला


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...