Agriculture news in marathi Wheat and gram area is likely to increase in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

परभणी :  सिंचन स्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ५० हेक्टरवर पेरणी होईल.

परभणी :  सिंचन स्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ५० हेक्टरवर पेरणी होईल. गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात वाढ, तर ज्वारी, करडईच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे काढण्यात आला.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १५ हजार ९६१ हेक्टर आहे. यंदा जोरदार पावसामुळे जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर, माजलगाव, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प, करपरा, मासोळी हे मध्यम प्रकल्प, गोदावरी नदीवरील पाच उच्च पातळी बंधाऱ्यासह अन्य नद्यावरील बंधारे, लघु तलाव, विहिरी आदी सिंचन स्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे यंदा रब्बी पिकांखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. एकूण २ लाख ८७ हजार ५० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गव्हाच्या क्षेत्रात दीडपटीने, तर हरभऱ्याच्या क्षेत्रात दुपटीहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ज्वारी, करडईच्या क्षेत्रात यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे घट होईल. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे, खते  पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले.

महाबीजकडे २२ हजार ४८० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे

महामंडळाकडे ३ हजार क्विंटल, खाजगी कंपन्यांकडे २० हजार ६०६ क्विंटल असे एकूण ४६ हजार ८६ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यात ज्वारीचे २ हजार ४१५ क्विंटल, गव्हाचे १७ हजार क्विंटल, मक्याचे २२५ क्विंटल, हरभऱ्याचे २६ हजार २५० क्विंटल, करडईचे ११९ क्विंटल, सुर्यफुलाचे २ क्विंटल, इतर पिकांचे एकूण ७५ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी एकूण १० हजार ९३८ टन खतसाठा उपलब्ध आहे. त्यात युरिया ३ हजार ८८ क्विंटल आहे.


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...