khandesh
khandesh

खानदेशात ज्वारी, गहू आडवा 

खानदेशात शुक्रवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पाऊस अनेक भागात झाला. यामुळे मका, गहू, दादर ज्वारी या पिकांची हानी झाली आहे.

जळगाव ः खानदेशात शुक्रवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पाऊस अनेक भागात झाला. यामुळे मका, गहू, दादर ज्वारी या पिकांची हानी झाली आहे. या फटक्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पण जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात पंचनामे सुरूच झाले नसल्याची स्थिती आहे. 

मका, गहू व ज्वारी आडवी झाली आहे. दादर ज्वारी, गहू पीक पक्व होत आले आहे. त्याची कापणी सुरू होईल, अशी स्थिती होती. पण त्यातच पाऊस आल्याने नुकसान झाले आहे. मका पीक आडवे झाले आहे. पीक निसवले आहे. त्याला कणसे पक्व होण्याची प्रक्रिया सुरू होती. पण पीक आडवे झाल्याने त्याचेही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. नुकसान झाले, पण भरपाई केव्हा मिळणार, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. त्यांना सध्या पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे.  गुरुवारी (ता.१८) सायंकाळीदेखील धुळ्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगावमधील जामनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा आदी भागात पाऊस झाला होता. जामनेरात औरंगाबादनजीकच्या काही गावांमध्ये काही सेकंद गारपीटही झाली. याचाही फटका भाजीपाला, केळी पिकाला बसला. शुक्रवारी सायंकाळी जळगाव व चोपडा, यावल तालुक्यातील तापीकाठावरील गावांमध्ये काही वेळ पाऊस झाला.  ‘तातडीने पंचनामे करा’  सुसाट वाराही सुटला होता. यात मका, गहू पीक आडवे झाले आहे. त्यामुळेने दाणे पक्व होणार नाहीत. दादर ज्वारी पिकाचेही अनेक भागात २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com