agriculture news in Marathi wheat and jowar crop damage in Khandesh Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खानदेशात ज्वारी, गहू आडवा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

खानदेशात शुक्रवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पाऊस अनेक भागात झाला. यामुळे मका, गहू, दादर ज्वारी या पिकांची हानी झाली आहे.

जळगाव ः खानदेशात शुक्रवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पाऊस अनेक भागात झाला. यामुळे मका, गहू, दादर ज्वारी या पिकांची हानी झाली आहे. या फटक्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पण जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात पंचनामे सुरूच झाले नसल्याची स्थिती आहे. 

मका, गहू व ज्वारी आडवी झाली आहे. दादर ज्वारी, गहू पीक पक्व होत आले आहे. त्याची कापणी सुरू होईल, अशी स्थिती होती. पण त्यातच पाऊस आल्याने नुकसान झाले आहे. मका पीक आडवे झाले आहे. पीक निसवले आहे. त्याला कणसे पक्व होण्याची प्रक्रिया सुरू होती. पण पीक आडवे झाल्याने त्याचेही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. नुकसान झाले, पण भरपाई केव्हा मिळणार, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. त्यांना सध्या पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. 

गुरुवारी (ता.१८) सायंकाळीदेखील धुळ्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगावमधील जामनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा आदी भागात पाऊस झाला होता. जामनेरात औरंगाबादनजीकच्या काही गावांमध्ये काही सेकंद गारपीटही झाली. याचाही फटका भाजीपाला, केळी पिकाला बसला. शुक्रवारी सायंकाळी जळगाव व चोपडा, यावल तालुक्यातील तापीकाठावरील गावांमध्ये काही वेळ पाऊस झाला. 

‘तातडीने पंचनामे करा’ 
सुसाट वाराही सुटला होता. यात मका, गहू पीक आडवे झाले आहे. त्यामुळेने दाणे पक्व होणार नाहीत. दादर ज्वारी पिकाचेही अनेक भागात २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...
मराठवाड्यात ‘पूर्वमोसमी’चे दणके सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
विक्रीपूर्वी सोयाबीन चाचणीवर...अकोला ः राज्यात या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री...
‘आत्मा’अंतर्गत शेतकरी समित्यांची...अकोला ः राज्यात कृषी विस्तारविषयक सुधारणांसाठी...
तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष खरड...सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात...
खत उद्योगाचे सावध नियोजन पुणे  : गेल्या हंगामातील पहिल्या...
राज्यात पूर्वमोसमी, गारपिटीने पिकांचे...पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक...
सांगलीत बेदाणा सौदे बंद सांगली ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री...
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणारपुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने...
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणीअकोला : उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...