औरंगाबाद जिल्ह्यात गहू क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त वाढ

Wheat area in Aurangabad district more than doubled
Wheat area in Aurangabad district more than doubled

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, रब्बी ज्वारी आणि  हरभऱ्याचे क्षेत्र मात्र जवळपास समान क्षेत्रावर आहे. तर, मक्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत तिप्पट क्षेत्रावर पेरणी झाल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत ११५ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २ लाख ३९ हजार ९४० हेक्‍टरवर पेरणी झाली. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ३०० हेक्‍टर होते. त्या तुलनेत ८६ हजार ७२२ हेक्‍टरवर त्याची पेरणी झाली. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १० हजार ७९३ हेक्‍टर, तर ६१ हजार २० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९२३५ हेक्‍टर, तर प्रत्यक्षात पेरणी २७ हजार ९७२ हेक्‍टरवर झाली.  

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ९०२ हेक्‍टर, तर प्रत्यक्षात पेरणी ६१ हजार ३१८ हेक्‍टरवर झाली. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ७८० हेक्‍टर, तर प्रत्यक्षात पेरणी केवळ १२३ हेक्‍टरवरच झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व खुलताबाद तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांत रब्बीची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली. सूर्यफुलाचे सर्वसाधारण क्षेत्र १९७ हेक्‍टर आहे. मात्र, त्याची यंदा लागवडच झाली नसल्याचे कृषी विभागाचा पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले. 

  • अशी आहे रब्बीची पीकस्थिती...
  • वेगवेगळ्या वेळात पेरणी
  • ज्वारीवर मावा, चिकट्याचा प्रादुर्भाव
  • ज्वारी कणसे लागण्याच्या, काढण्याच्या अवस्थेत
  • गहू वाढीच्या, पोटरीच्या अवस्थेत 
  • हरभरा घाटे लागण्याच्या, भरण्याच्या अवस्थेत 
  • मका वाढीच्या, कणसे लागण्याच्या अवस्थेत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com