‘‘महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कामकाज पूर्णपणे मराठी भाषेत झाले आणि खासगी कामकाजात मराठी भाष
ताज्या घडामोडी
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार हेक्टरने वाढ
गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ३३ हजार ७० हेक्टरपैकी एक लाख ६९ हजार ९९५ हेक्टर म्हणजेच १२८ टक्के पेरणी झाली आहे.
पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ३३ हजार ७० हेक्टरपैकी एक लाख ६९ हजार ९९५ हेक्टर म्हणजेच १२८ टक्के पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलेतने चालू वर्षी ३६ हजार ९२५ हेक्टरने वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीस नोव्हेबर ते डिसेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून विभागात नगर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.
नगर जिल्ह्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. यामध्ये नगर, कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ पारनेर, कर्जत, पाथर्डी, संगमनेर, राहाता या तालुक्यात गव्हाची पेरणी झाली आहे. नेवासा, जामखेड तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे ७ हजार ३० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सुमारे ७ हजार ७४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
- 1 of 1055
- ››