राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू सरासरीहून दुप्पट
औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालीच नाही. दुसरीकडे गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालीच नाही. दुसरीकडे गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ६४ हजार ३६ हेक्टर ६० गुंठे इतके होते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख ८ हजार १८८ हेक्टर, जालना १ लाख ७४ हजार ३६८ हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार ४८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत १२७ टक्के अर्थात ८ लाख ४६ हजार ४७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ३०९ हेक्टर, जालना २ लाख ७३ हजार २६० हेक्टर ४० गुंठे, तर बीड जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ९०२ हेक्टर पिकांचा समावेश आहे.
तीन जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ६५ हजार ९९७ हेक्टर आहे. त्या तुलनेत २ लाख ९८ हजार ६३४ हेक्टर अर्थात ८१.५९ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. वाढ, पोटरी व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारी पीक आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ९४ हजार ३२४ हेक्टर, तर १ लाख ९६ हजार १०४ हेक्टर अर्थात २०७.९० टकके क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक, कांडी धरणे, वाढ ते पोटरीच्या अवस्थेत आहे.
मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ४६६ हेक्टर, तर १६३ टक्के अर्थात ४३ हजार १५८ हेक्टरवर पेरणी झाली. हे पीक काही ठिकाणी तुरे लागण्याच्या, तर काही ठिकाणी कणसं लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार ५४७ हेक्टर, ३ लाख ४ हजार ३५७ हेक्टरवर अर्थात १७९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक फूलोरा, आणि घाटे लागण्याच्या
अवस्थेत आहे.
करडईची ८३४ हेक्टरवर पेरणी
करडईची ८३४ हेक्टरवर, जवस १४७ हेक्टर ६० गुंठे, सूर्यफूल १७० हेक्टर, मोहरी २९ हेक्टर, तर इतर गळीतधान्याची १०४१ हेक्टरवर, इतर कडधान्याची २२१ हेक्टरवर, इतर तृणधान्यांची १७७४ हेक्टरवर पेरणी झाली.
- 1 of 1053
- ››