बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू, केळीचे नुकसान

बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४) अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे गाजीपूर, मोदापूर, सातरगाव शेतशिवारातील केळी आडवी पडली. हरभरा व मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने सर्व्हेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Wheat, banana damage due to windstorm
Wheat, banana damage due to windstorm

बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४) अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे गाजीपूर, मोदापूर, सातरगाव शेतशिवारातील केळी आडवी पडली. हरभरा व मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने सर्व्हेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शनिवारी (ता. ४) सायंकाळच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक गावातील घरावरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आला़.

बाळापूर तालूक्यात पाच वाजेच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली़. पावसाच्या प्रारंभी सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली. तर नंतर वादळ झाल्याने शेतशिवारात उभे असलेले पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले.

वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बाळापूर तालुक्यातील सातरगाव, गाजीपूर शेतशिवारात असलेल्या मका व केळीला बसला. शेतकरी शामराव शेलार यांच्या चार एकरावरील केळीची बाग नष्ट झाली आहे. तर मनोज ठाकूर, मदनसिंग नेरवैया, टिळक ठाकूर यांच्या शेतातील काकडी, कांदा, गहू व केळीचे अतोनात नुकसान झाले.  शासनाने सर्व्हेक्षण करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सातरगावचे शेतकरी शामराव शेलार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com