जालन्यात गहु सोंगणीला सुरुवात

पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये गहू पिकाच्या सोंगणीला सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. २३) अनेक ठिकाणी शेतकरी गहू पिकाची सोंगणी करताना दिसून आले.
Wheat harvest begins in Jalna
Wheat harvest begins in Jalna

पिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये गहू पिकाच्या सोंगणीला सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. २३) अनेक ठिकाणी शेतकरी गहू पिकाची सोंगणी करताना दिसून आले.

या वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, मका आदींसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु पाणीसाठा ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. नदी-नाले तळे आणि विहिरींना भरपूर पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीतील पिकांना प्राधान्य दिले आणि मोठ्या प्रमाणावर रब्बीतील गहू, हरभरा, मका आदी पिकांची लागवड केली. 

पिके सुद्धा आता जोरदार आली आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि धुके मोठ्या प्रमाणात वाढल्याने हरभऱ्या सारख्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यावर्षी पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात गहू पिकाचा पेरा वाढला आहे. निश्चितच गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 

दोन दिवसांपासून धुके आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी काढणीसाठी आलेल्या गव्हाची सोंगणी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सोंगणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. पाऊसही पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे निश्चितच शेतकरी ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.

काही शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक अद्याप काढणीस आलेले नाही. ज्या शेतकऱ्यांचे पीक काढणी झाले आहे. ते शेतकरी आता गव्हाची सोंगणी करित आहेत. परंतु परिसरामध्ये धुके आणि ढगाळ वातावरण पडत असल्याने ऐन काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. - दत्ता चिकटे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com