agriculture news in marathi wheat, horsepea, sourgum incoming steady in Khandesh APMC's | Agrowon

खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील बाजारात भाजीपाल्यासह गहू, हरभरा, दादर ज्वारीची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु किरकोळ बाजार बंद असल्याने बाजार समितीमधील दरांवर परिणाम होत आहे. 

जळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील बाजारात भाजीपाल्यासह गहू, हरभरा, दादर ज्वारीची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु किरकोळ बाजार बंद असल्याने बाजार समितीमधील दरांवर परिणाम होत आहे. 

बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला विक्रीचे बाजार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असल्याने बाजार समिती बंद केली जाणार नाही. लिलाव सुरूच राहतील. कोरोनासंबंधी सर्व उपाययोजना बाजार समितीत केल्या आहेत, अशी भूमिका मांडली आहे. 

किरकोळ बाजारातील भाजीपाला व धान्य विक्री मागील दोन-तीन दिवसात हळूहळू कमी झाली आहे. तसेच मोठ्या गावांमधील आठवडे बाजारही बंद केले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. 

सोमवारी (ता.२३) जळगाव बाजार समितीमध्ये ११ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. तर तिला दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत मिळाले. परंतु मंगळवारी (ता.२४) किरकोळ बाजार बंद झाल्याने बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. लाल कांद्याची सुमारे ५०० क्विंटल आवक झाली.

त्याचे लिलाव सुरळीत झाले. दर कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. धुळे शहर, जळगाव शहर, चोपडा, जामनेर, रावेर, शिरपूर येथील किरकोळ बाजार मंगळवारी बंद ठेवले होते. किरकोळ बाजार बंद असल्याने अनेक ग्राहक सकाळी थेट बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पोचले होते. 

बाजार समितीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्याची आवक सुरळीत आहे. मंगळवारी आवक मात्र काहीशी कमी झाली. गव्हाची सुमारे १०० क्विंटल, ज्वारीची १८० तर हरभऱ्याची ५०० क्विंटल आवक झाली. चोपडा, अमळनेरात आवक कमी  होती. तर धुळे येथेही फारशी धान्याची आवक झाली नाही. यामुळे धान्य बाजारातील लिलाव पूर्वीसारखे झाले नाहीत. भाजीपाल्याचे लिलाव सकाळीच झाले. परंतु दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. 

परराज्य व परजिल्ह्यातून बटाटा, लसूण, घेवडा, कोबी, वाल यांची मोठी आवक होत असते. परंतु ही आवक मंगळवारी झाली नाही. बटाट्याचे कुठलेही लिलाव जळगाव बाजार समितीमध्ये झाले नसल्याची माहिती मिळाली.


इतर बाजारभाव बातम्या
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...