वादळामुळे पांगरी नवघरे शिवारात गव्हाचे नुकसान

वादळामुळे पांगरी नवघरे शिवारात गव्हाचे नुकसान
वादळामुळे पांगरी नवघरे शिवारात गव्हाचे नुकसान

वाशीम  ः जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून गुरुवारी (ता. ६) रात्री काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला. याचवेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे शिवारात पंजाब नवघरे यांचा सहा एकरांतील गहू जमीनदोस्त झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मालेगाव तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसापेक्षा या वेळी वाऱ्याचा जोर अधिक होता. या वाऱ्यामुळे रब्बीत लागवड केलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. पांगरी नवघरे परिसरात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व काही शेतकऱ्यांकडे असलेल्या तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. पांगरी नवघरे येथील शेतकरी पंजाब मोतीराम नवघरे यांच्या शेतातील गहू पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे. असेच नुकसान इतर शेतकऱ्यांचेही झालेले आहे. शासनाच्यावतीने कृषी विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com