राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढ

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गतवर्षीपेक्षा ३८ टक्के, तर नगर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा सरासरीच्या ४६ टक्के वाढ झाली आहे. यंदा राज्यात १२ लाख ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
Wheat sector grows by 38%
Wheat sector grows by 38%

नगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता झाल्याने यंदा गव्हाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गतवर्षीपेक्षा ३८ टक्के, तर नगर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा सरासरीच्या ४६ टक्के वाढ झाली आहे. यंदा राज्यात १२ लाख ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

राज्याच्या बहुतांश भागात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. सलग महिनाभर पाऊस सुरू असल्याने ज्वारीची पेरणी वेळेत करता आली नाही. ज्वारी पेरणी वेळत न झालेल्या जागी गहू घेतला गेला आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत ३८ टक्के क्षेत्रवाढ झाली आहे. बहुतांश भागात यंदा गव्हाचे क्षेत्र जोमात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार हेक्टरी सरासरी १६ ते २० क्विंटल उत्पादन येण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा साधारण वीस ते बावीस लाख टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी ४९ हजार ८८५ हेक्टर गव्हाचे सरासरी क्षेत्र होते. गेल्या वर्षी ८४ हजार ३८१ म्हणजे १६९ टक्के पेरणी झाली होती. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाल्याने यंदा सरासरीच्या क्षेत्रात सात हजाराने वाढ करून ५६ हजार ८६३ हेक्टर केले. यंदा आतापर्यंत १ लाख २३ हजार ४२८ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.  

बाजारात आवक जेमतेम नगरसह राज्यातील बाजार समित्यात सध्या गव्हाची जेमतेम आवक असून, १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. अजून स्थानिक गव्हाचे उत्पादन निघालेले नसलेल्याने स्थानिक गव्हाचे आवक अल्प आहे. सध्या गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना भागांतून गव्हाची आवक होत आहे. स्थानिक पातळीवरील गहू बाजारात आल्यानंतर दर टिकून राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

राज्यात गहू पेरणीचे क्षेत्र

  • सरासरी क्षेत्र ः ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर
  • यंदाची पेरणी क्षेत्र ः १२ लाख ३१ हजार १६० हेक्टर
  • यंदाची पेरणी (टक्केवारी) ः १४०.६३
  • गतवर्षीचे पेरणी क्षेत्र ः ११ लाख ९९ हजार ४६५
  • गतवर्षीच्या पेरणीची टक्केवारी ः १०२.६३
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com