Agriculture news in Marathi Wheat sowing possible on 31,000 hectares in Khandesh | Agrowon

खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी शक्य

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन हजार हेक्टरने वाढणार असून, एकूण पेरणी ३१ हजार हेक्टरपर्यंत होवू शकते. पेरणीची तयारी सर्वत्र सुरू आहे.

जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन हजार हेक्टरने वाढणार असून, एकूण पेरणी ३१ हजार हेक्टरपर्यंत होवू शकते. पेरणीची तयारी सर्वत्र सुरू आहे.

वातावरणात गेल्या चार दिवसांत बदल झाले आहेत. गेले दोन दिवस सायंकाळनंतर तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. पुढे थंडी वाढेल, असे संकेत मिळत आहेत. यंदा थंडी चांगली राहील, असा अंदाज काही महिन्यांपूर्वी हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता. मका, बाजरीचे दर कमी आहेत. गव्हाचे दर मात्र स्थिर राहीले आहेत. गव्हाला मागणी आहे.

मक्याचे वन्यप्राणीदेखील अधिक नुकसान करतात. यंदा पाऊस चांगला झाला आहे. विविध नदीकाठच्या भागासह इतर भागातही जलसाठे मुबलक आहेत. यामुळे गव्हाची पेरणी यंदा वाढेल, असे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ ते १९ हजार हेक्टरवर गहू पेरणी होईल. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १२ हजार हेक्टरवर गहू पेरणी अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग काही शेतकरी गटांच्या मदतीने खपली गव्हाची पेरणीचे नियोजन करीत आहे. त्यासाठी मोफत बियाणे वितरण केले जाणार आहे. ७५ एकरात हा गहू असेल.

गव्हाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. एकरी ४० किलो बियाणे गहू पेरणीसाठी लागते. यातच अनेक शेतकरी घरातील बियाण्याची पेरणीदेखील करतात. पेरणीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. सोयाबीन, मूग, उडदाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गव्हाची पेरणी होईल. पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. दिवाळीनंतर पेरणी अनेक भागात वेग घेईल. परंतु त्यापूर्वीदेखील पेरणी उरकून घेण्याचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत. पूर्वमशागत, शेत भुसभुशीत करून घेतले जात आहे. अनेक शेतकरी ठिबक, तुषार सिंचनाचा उपयोग करून गहू पेरणीचे नियोजन करीत आहेत. पेरणी यंदा वाढणार असल्याने कृषी विभागानेही बियाण्याचा पुरेसा पुरवठा करून घेतल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...