agriculture news in marathi Wheat sowing slows down in Khandesh | Agrowon

खानदेशात गहू पेरणीचा वेग मंदावला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

जळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे गहू पेरणी रखडत सुरू आहे. किमान तापमानात मोठी घटही झाली. याचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. 

जळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे गहू पेरणी रखडत सुरू आहे. किमान तापमानात मोठी घटही झाली. याचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. 

तसेच थंडीचा अभाव, उष्णतेचा परिणाम,  यामुळे कोरडवाहू दादर ज्वारी, हरभरा क्षेत्रातील ओलावादेखील कमी झाला. किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. तसेच दिवसादेखील उकाडा जाणवत होता. गव्हाची पेरणी गेल्या महिन्याच्या मध्यानंतर बऱ्यापैकी सुरू होती. खानदेशात यंदा सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टरवर गहू पेरणी अपेक्षित आहे.

पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्रातही पेरणीला गती येईल, असे सांगितले जात होते. परंतु, प्रतिकूल वातावरणामुळे गहू पेरणी रखडली. गेल्या आठवड्यात पेरणीचा वेग मंदावला. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. तर, धुळे व नंदुरबारातही सुमारे पाच हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जामनेर या भागात अधिक पेरणी होईल. तर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. पेरणीला गारठा वाढल्यास गती येईल. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी क्षेत्रात मशागत करून घेतली आहे. 

थंडी वाढल्यानंतर पिके चांगली बहरणार

थंडी कमी असल्याने गेल्या महिन्यात पेरणी केलेल्या गहू पिकाच्या वाढीवरही काहीसा परिणाम दिसून आला. तसेच पीक पिवळसर झाले. पीक हवे तसे नसल्याने काही शेतकऱ्यांनी संप्रेरकांची फवारणी घेतली. तसेच खते देऊन सिंचनही करून घेतले. यामुळे पिकात सुधारणा दिसून आली. परंतु, थंडी वाढल्यानंतरच गहू पिकाची चांगली वाढ होईल. 


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...