जळगावात खपली गहू पेरणी वाढणार

आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देणाऱ्या व बऱ्यापैकी उत्पादनक्षम असलेल्या खपली गव्हाची पेरणी जिल्ह्यात वाढणार आहे. यासाठी कृषी विभागासह शेतकरी सरसावले आहेत.
Wheat sowing will increase in Jalgaon
Wheat sowing will increase in Jalgaon

जळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देणाऱ्या व बऱ्यापैकी उत्पादनक्षम असलेल्या खपली गव्हाची पेरणी जिल्ह्यात वाढणार आहे. यासाठी कृषी विभागासह शेतकरी सरसावले आहेत.

जिल्ह्यात सर्वप्रथम २०१७-१८ मध्ये दसनूर (ता. रावेर) येथील शेतकरी वैशाली पाटील यांनी पुणे येथील आघारकर संस्थेतर्फे संशोधित खपली गव्हाच्या एएसीएस २९७१ या वाणाची (सत्यप्रत) अडीच एकरात पेरणी केली होती. एकरी सुमारे ४० किलो बियाणे पेरणीसाठी लागते. त्यांना एकरी १२ क्विंटल उत्पादन आले. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पाटील या वाणाची पेरणी करणार आहे. वैशाली पाटील यांनी या वाणापासून बिस्किटे, पीठ आदींची निर्मिती व विक्रीही सुरू केली आहे. प्रक्रिया उद्योगात चांगली संधी आहे. हा वाण आरोग्यदायी व चांगले उत्पादन देणारा असल्याने शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) शेतकरी गटांना प्रात्यक्षिकासंबंधी हे बियाणे मोफत दिले जाणार आहे.

सुमारे ७५ एकरात याची पेरणी यंदा जिल्ह्यात होईल. तसेच वैशाली पाटीलदेखील खपली गव्हाच्या एएसीएस २९७१ वाणाच्या सत्यप्रत बियाण्याची माफक दरात थेट शेतकऱ्यांना विक्री करीत आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने या वाणाची खरेदी शेतकरी वैशाली पाटील यांच्याकडून गेल्या हंगामात केली होती. यंदा पाल येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे कृषी विभाग खपली गव्हाचे बियाणे खरेदी करीत आहे. जिल्ह्यात या वाणाची पेरणी वाढविण्यासाठी कृषी यंत्रणा कार्यरत झाल्याची स्थिती आहे.

आरोग्यदायी वाण खपली गहू पौष्टीक, वात-पित्तशामक आहे. मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्ठता आदी आजारांत आहारासंबंधी योग्य मानला जातो. त्यात प्रथिने, कर्बोदके, फायबरचे चांगले प्रमाण आहे. त्यापासून विविध उपपदार्थदेखील तयार करता येतात. यामुळे त्यासंबंधीचा प्रसार करण्यासाठी कृषी यंत्रणा, शेतकरी यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यात मी सर्वप्रथम आघारकर संस्थेने संशोधित खपली गव्हाची पेरणी अडीच एकरात केली होती. त्याचे चांगले फायदे मला दिसून आले. त्यापासून मी प्रक्रिया करून बिस्किटे व इतर उपपदार्थ करीत आहे. दरवर्षी मी त्याची पेरणी करीत असून, जिल्ह्यात त्याचा प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. - वैशाली पाटील, शेतकरी, दसनूर (ता.रावेर), मो.क्र. - ७६२०२३९१३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com