Agriculture news in Marathi Wheat will be sale by token at Akola Market Committee | Agrowon

अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन पद्धतीने होणार विक्री

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत केले जाणार आहेत. तसेच या बाजार समित्यांमध्ये गव्हाची विक्री ही टोकन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी (ता. सहा) या अनुषंगाने बाजार समिती सचिव, काही अडते, व्यापारी व संचालकांची बैठक घेतली. 

अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत केले जाणार आहेत. तसेच या बाजार समित्यांमध्ये गव्हाची विक्री ही टोकन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी (ता. सहा) या अनुषंगाने बाजार समिती सचिव, काही अडते, व्यापारी व संचालकांची बैठक घेतली. 

बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांच्या स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे. ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार देशभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतमालाची जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आवक बंद झाली होती. आता हे व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व सेवा सुरू राहण्याच्या दृष्टीने पुरवठा साखळी व वाहतूक सुरू राहील याची जबाबदारी संबंधित तालुका उपनिबंधक/ सहायक निबंधकांवर सोपविण्यात आली. 

जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीस सहायक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव, काही व्यापारी-आडते-हमाल संचालक उपस्थित होते. बैठकीत बाजार समित्यांनी करावयाच्या ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा तसेच बाजार पूर्ववत सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला. सर्व बाजार समित्या टप्प्याटप्याने पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांतर्गत अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा व बार्शीटाकळी या बाजार समित्यांमध्ये टोकन पद्धतीने मालाची आवक घेण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला गहू बाजार समितीमध्ये विकायचा आहे त्यांनी आधी संपर्क क्रमांकावर माहिती देऊन टोकन क्रमांक तसेच बाजार समितीत कोणत्या दिवशी माल आणावयाचा आहे ती माहिती प्राप्त करून घ्यावी लागणार आहे. 

सुरुवातीला एका दिवशी फक्त ५० शेतकऱ्यांच्या गव्हाची आवक घेतली जाईल. गव्हाच्या खरेदीस गुरुवार (ता. नऊ) पासून सुरुवात केली जात आहे. मात्र, टोकन क्रमांकाशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. याकरिता आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घेऊन दिलेल्या तारखेस माल सकाळी ९ वाजता बाजार समितीमध्ये आणायचा आहे, असे आवाहन करण्यात आले.

बाजार समिती संपर्क क्रमांक
अकोला ०७२४-२४३३४७८, ९८८१००८५४४, ९८८११८५३४२
मूर्तीजापूर ७०३८६२२३३३, ९८८१४८१७११
तेल्हारा ९७६४६२१६१४, ९८८१९४१०४२
बार्शीटाकळी ९४०३८७२८२२, ८६०५७३४१४३

संबंधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गहू विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशी माल विकण्यास आणून बाजार समित्यांना सहकार्य करावे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...