agriculture news in Marathi when inquiry will be done of farmers suicide Maharashtra | Agrowon

हजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय` चौकशी कधी करणार?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

मागील पाच दशकात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची सीबीआय चौकशी कधी होणार, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शासनकर्त्यांना केला आहे. 

अकोला ः राज्यात काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगने आत्महत्या केल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. मात्र, मागील पाच दशकात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची सीबीआय चौकशी कधी होणार, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शासनकर्त्यांना केला आहे. त्यांनी समाज माध्यमातून उपस्थित केलेल्या या प्रश्‍नांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. 

‘‘राज्यात सुशांतसिंग प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या प्रकरणात तुपकर यांनी उडी घेत शासनकर्त्यांना शेतकरी आत्महत्यांबाबत गांभीर्य कधी दाखवणार असे विचारले आहे. 
गेल्या पाच दशकात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनकर्त्यांनी विविध पॅकेज देऊन या महत्त्वाच्या प्रश्‍नाला झुलते ठेवले. परंतु अद्यापही कुठल्याही शासनकर्त्यांना आत्महत्या थांबवता आलेल्या नाहीत.

कधीही शासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. चित्रपट अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणाला जितक्या गांभीर्याने शासनाने प्राधान्य दिले तेवढीच गंभीरता, न्याय शेतकऱ्यांबाबत का लावल्या जात नाही. आजवर हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्या. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,’’ असेही तुपकर यांचे म्हणणे आहे.

राज्यपाल शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता दाखवणार का ?
दरम्यान तुपकर यांनी अभिनेत्री कंगना रानावतने राज्यपालांची भेट घेतल्या प्रकरणीसुद्धा राज्यपालांनाही प्रश्‍न विचारला आहे. एवढी तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दाखवणार का?, असे त्यांनी म्हटले आहे. समाज माध्यमातून उपस्थित केलेल्या या प्रश्‍नांवरही सर्वदूर प्रतिक्रिया येत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...