Agriculture news in marathi When is the panchnama of damaged crops in Sangli district? | Agrowon

सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कधी?

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकासह द्राक्ष, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी करणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकासह द्राक्ष, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी करणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता.३) पावसाने उघडीप दिली. परंतु जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव तालुक्यात पुन्हा शनिवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभरा पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. अगोदर महापुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील पिकाला देखील फटका बसू लागला आहे.

अजूनही शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात द्राक्षाचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हरभरादेखील पावसामुळे बाधित झाला आहे. सखल भागातील शेतात पाणी साचल्याने हरभरा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कधी सुरू होणार, असा प्रश्‍न आहे.

कृषी विभागाकडून पाहणी

जिल्‍ह्यात या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागाने पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान आहे. तर काही प्रमाणात डाळिंबालाही फटका बसला आहे. तर हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. सध्या किती क्षेत्रावरील हरभरा बाधित झाला आहे, ते सांगणे कठीण आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. पंचनामे करण्याचे आदेश आल्यानंतर तातडीने पंचनामे केले जातील.
- मनोजकुमार वेताळ, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली


इतर बातम्या
अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला काय हवे...लवकरच २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक...
कृषी तंत्रज्ञान,ॲक्वाकल्चर क्षेत्रातील...२०२२ च्या केंद्रीय अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना तातडीने...बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
नवीन बोअरवेलऐवजी `फ्लशिंग’वर भर नागपूर : उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
वाशीमलाही मिळाला १५ कोटींचा वाढीव निधी वाशीम ः जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज...
जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची...जळगाव ः जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ...सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा...
शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी...सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना...
जळगाव : खासगी संस्था, सोसायट्यांच्या ...जळगाव : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे...
सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात...सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली...
‘पाच हजार १२२ कुटुंबांना परभणी...परभणी ः ‘‘‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत...
परभणीत ३८.९१ लाखांच्या निधीची कामे...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मिक...
क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११.९०...कोल्हापूर : उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...