Agriculture news in marathi; When is water reservation for projects for Rabbi in Khandesh? | Page 2 ||| Agrowon

खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये पाण्याचे आरक्षण केव्हा?

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी पाणी आरक्षित करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी पाणी आरक्षित करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

दरम्यान, सरकार स्थापन झालेले नसल्याने लोकप्रतिनिधींमध्येही समस्या सोडविण्यासंबंधी फारसा उत्साह दिसत नाही. पाणी आरक्षणासंबंधी उशीर होऊ नये यासाठी प्रशासन व कालवा समित्यांची बैठक मागील महिन्यात होणे अपेक्षित होते. जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आणि नंदुरबारात दरा, सुसरी आदी प्रकल्पांमध्ये रब्बीसंबंधी सिंचनासाठी पाणी आरक्षित होईल, असे मध्यंतरी पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले होते.

जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन ते अडीच लाख हेक्‍टरवर, धुळ्यात एक लाख आणि नंदुरबारातही सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर रब्बी पिके असणार आहेत. यातील निम्मे क्षेत्राला सिंचनासंबंधी प्रकल्पांमधून पाण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. गिरणा धरणाच्या माध्यमातून पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव आदी भागातील २५ हजार हेक्‍टर, वाघूरच्या माध्यमातून भुसावळ, जळगावमधील सुमारे सात हजार हेक्‍टर क्षेत्रास तर हतनूरच्या माध्यमातून भुसावळ, यावल, रावेर व चोपडामधील मिळून सुमारे १८ हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाची सोय करता येऊ शकते. 

धुळ्यात पांझरा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे, शिंदखेडा, साक्री व अनेर प्रकल्पामुळे शिरपूर व जळगावमधील चोपडा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सिंचनासंबंधी व्यवस्था होणार आहे. या भागातील कोरडवाहू कापूस पिकासही दोन वेळेस सिंचनासाठी या प्रकल्पांमधून पाणी मिळावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कोरडवाहू कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...