Agriculture news in Marathi, When will the decisions of the Board of Control of Crop Board be implemented? | Agrowon

ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी कधी करणार?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

नांदेड : ऊसदर नियंत्रण मंडळाच्या आजवर झालेल्या बैठकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याची खंत व्यक्त करत एफआरपी आणि आरसीएफची संपूर्ण बाकी शेतकऱ्यांना व्याजासह द्यावी, अशी मागणी ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक बुधवारी (ता. १७) मुंबई येथील मंत्रालयामध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये २०१८-१९मधील ऊस गाळप आणि ऊस थकबाकीचा आढावा घेतला जाणार आहे. २०१७-१८ मधील आरसीएफ दर निश्चिती तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. 

नांदेड : ऊसदर नियंत्रण मंडळाच्या आजवर झालेल्या बैठकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याची खंत व्यक्त करत एफआरपी आणि आरसीएफची संपूर्ण बाकी शेतकऱ्यांना व्याजासह द्यावी, अशी मागणी ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक बुधवारी (ता. १७) मुंबई येथील मंत्रालयामध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये २०१८-१९मधील ऊस गाळप आणि ऊस थकबाकीचा आढावा घेतला जाणार आहे. २०१७-१८ मधील आरसीएफ दर निश्चिती तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. 

इंगोले म्हणाले, ‘‘साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देत नाहीत. काही जण टप्प्याटप्प्याने देतात. काही कारखानदारांनी तर गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, अशा कारखान्यांच्या अनेक तक्रारी मंडळाच्या समोर मांडल्या. परंतु प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही.त्यामुळे त्यावर ठोस कार्यवाही करावी त्यासाठी समितीचे सर्व सदस्य आग्रही राहणार आहेत. एफआरपी बाबत प्रशासन थोडीबहुत कार्यवाही करत आहेत. परंतु आरएसएसच्या रकमेबाबत मात्र प्रशासन कारखानदारांना साधी नोटीस देण्याची तसदी का घेतली जात नाही, हा प्रश्न हा या बैठकीत उपस्थित करणार आहोत.’’

मंडळाचे शेतकरी प्रतिनिधी प्रल्हाद इंगोले, शिवानंद दरेकर, भानुदास शिंदे, शिवानंद दरेकर, विठ्ठल पवार, पांडुरंग थोरात, मोहंमद पटेल यांनी नेहमीच शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे, असे इंगोले यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या

  •    एफआरपी आणि आरएसएफची पूर्ण बाकी शेतकऱ्यांना व्याजासह देणे
  •    एफआरपी दोन-तीन टप्प्यात घेण्याबाबत काही कारखानदार शेतकऱ्यांकडून सहमती पत्र लिहून घेत आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी 
  •    तीन टप्प्यात वाहतूक खर्च आकारण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करावी. 
  •    तोंड वाहतूक खर्चात इतर खर्च टाकून एफआरपी कमी न करता तो खर्च स्वतंत्र करावा 
  •    आरआरसी कार्यवाहीची अंमलबजावणी न झालेल्या कारखान्याची जमिन शेतकऱ्यांच्या नावे करावी
     

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...