कारंजालाड, जि.
बातम्या
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण केव्हा होणार?
जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना केंद्राच्या किसान सन्मान निधीतून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. यासंदर्भात जळगाव, रावेर, यावल, चोपडा भागातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दोन हजार रुपये मागील २४ फेब्रुवारी रोजी जमा झाले होते. निधी मात्र शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मार्चमध्ये यावल, रावेर व चोपडा भागात काही शेतकऱ्यांना वितरण झाले. परंतु, अनेक ठिकाणी हा निधी वितरित झालेला नसल्याने शेतकरी तलाठी व तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे बॅंक खाते तलाठी, ग्रामसेवक मंडळीने चुकविली आहेत. नावांच्या चुका अनेक भागांत आहेत. या त्रुटी, चुका दूर करण्याची कार्यवाही प्रशासन करीत आहे. ही कार्यवाही सुरू असल्याने अपवाद वगळता हा निधी कुठेही वितरित झालेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंका किंवा आयएफएससी कोड असलेल्या बॅंकांमध्ये हा निधी जमा करण्यात येईल; त्यासंबंधीचे बॅंक खाते क्रमांक हवेत, असे तलाठी, तहसीलदारांनी म्हटले होते. नंतर हा निधी फेब्रुवारीत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. शेतकरी या निधीसंबंधी प्रतीक्षा करीत असून, काही संघटनांनी प्रशासनाला मध्यंतरी निवेदनदेखील दिले आहे.
बॅंक खात्यासंबंधीच्या चुका जवळपास १४ हजार शेतकऱ्यांबाबत खानदेशात झाल्या आहेत. सव्वादोन लाख शेतकरी या योजनेत पात्र दिसत असले, तरी १०० टक्के पात्र शेतकऱ्यांची माहिती तलाठी व ग्रामसेवक यांनी संकलित केलेली नाही. तलाठी सध्या या कामासंबंधी कार्यालयात काम करीत आहेत. निधीचे वितरण निवडणुकीच्या निकालानंतर होईल, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत.
- 1 of 915
- ››