रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?

नरखेड तालुक्यामधील पंचायत समिती सर्कल भिष्णूरअंतर्गत येणाऱ्या रानवाडी तलावाचे रडगाणे संपता संपत नसल्याने शेतजमीन देऊन ही शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित आहे.
When will the exile of Ranwadi project end?
When will the exile of Ranwadi project end?

जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत समिती सर्कल भिष्णूरअंतर्गत येणाऱ्या रानवाडी तलावाचे रडगाणे संपता संपत नसल्याने शेतजमीन देऊन ही शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित आहे. तलावाला ३५ वर्ष झाले तरी मात्र हे प्रकल्प आपले सिंचनाचे उद्दिष्टे गाठू शकले नाही. यामुळे या तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ केव्हा मिळणार? हा खरा प्रश्न आहे.

नरखेड तालुक्यातील रानवाडी येथे सिंचनासाठी तलाव क्रमांक १ व २ निर्माण करण्यात आले. यातून कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याचे उद्दिष्टे होते. याची सिंचन क्षमता ७०० एकर निश्चित करण्यात आली होती. सन १९८६ या वर्षात रानवाडी तलाव १ व २ निर्मिती करण्यात आली होती व पाच किलोमीटरचा कालवा ही तयार करण्यात आला आहे. अगोदर या तलावांचे देखभाल लघु पाटबंधारे विभाग (राज्यस्तर) कडे होती. आता मात्र याचे दुरुस्तीचे काम जाम प्रकल्पाच्या सिंचन विभागाच्या मेंटेनन्स विभागाकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे दुरुस्तीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे.

रानवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जामगाव, मायवाडीचा काही भाग, जामगाव खुर्द, जोलवाडी पर्यंत कालवा निर्माण करण्यात आला आहे. पण जामगाव शिवजवळ गंगावाला नाल्यावर लोखंडी कालव्यासाठी लोखंडी पूल बनविण्यात आला आहे. पण अद्यापही या बांधकामावरून वरील भागातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळू शकले नाही. जाम प्रकल्पाचा मुख्य कालवा जामगाव या गावाजालावून उमठा या गावाला गेला आहे. तरी पण जामगाव गावातील शेती जाम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून वगळण्यात आली आहे.

जवळपास जामगाव, मायवाडी, जोलवाडी येथील ५०० हेक्टर शेती जाम प्रकल्पातून वगळली गेली आहे. रोहणा येथे ही तलाव आहे, पण तेथील शेतकरी देखील सिंचानापासून वंचित आहे. जाम व रानवाडी प्रकल्पात सर्वाधिक शेती जामगाव येथील शेतकऱ्यांची कालव्यासाठी संपादित करण्यात आली आहे आणि याच भागातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.

रानवाडी प्रकल्पावर पाणी वाटप सहकारी संस्था निर्माण करण्यात आली आहे. पण प्रकल्पाचे पूर्ण काम झाली नसल्यामुळे अद्याप ही हा प्रकल्प संस्थेकडे सोपविण्यात आला नाही. यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. शेतकऱ्यांच्या पिढ्या जात आहे, पण शेती देऊन शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नाही, हे दुर्दैव.. - वसंत चांडक, मुख्य प्रवर्तक, सती अनसूया माता सहकारी पाणी वाटप संस्था, रानवाडी प्रकल्प

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com