शेतीच्या प्रश्नावर कधी बोलणार ः वसुंधरा काशीकर 

एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी दरिद्री आणि एका किलोचं सव्वा किलोही लोखंड करू न शकणारा कारखानदार मात्र श्रीमंत हे काय गणित आहे.
Vasundhara kashikar
Vasundhara kashikar

रावेरी, जि. यवतमाळः एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी दरिद्री आणि एका किलोचं सव्वा किलोही लोखंड करू न शकणारा कारखानदार मात्र श्रीमंत हे काय गणित आहे, असा शेतीच्या मूलभूत समस्येला हात घालणारा प्रश्न मराठी साहित्याला का पडत नाही, असा प्रश्न उपस्थित करत काशीकर यांनी मराठी साहित्य विश्वाने यापुढे तरी शेती-मातीच्या प्रश्नाशी सुसंगत लेखन करण्यास सज्ज व्हावे, अशी अपेक्षा आपल्या केली.  सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून शनिवारी (ता.२०) त्या बोलत होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २० व २१ मार्चला नियोजित संमेलन स्थगित करून त्याऐवजी झूमच्या (Zoom) माध्यमातून ऑनलाइन वेबमिलन सप्ताह घेण्यात येत आहे. शनिवारी संमेलनाचा ऑनलाइन उद्घाटन समारंभ पार पडला.  ‘‘मराठी साहित्याचा अभ्यास केला तर असे दिसते की, मराठी साहित्यानं नगण्य म्हणता येईल अशी शेतकऱ्यांच्या दु:खाची व समस्यांची दखल घेतली आहे. काही अपवाद सोडले तर सर्वसामान्यपणे लेखकांचे, कवींचे लिखाणाचे विषय हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शहरी जीवनाचं चित्रीकरण करणारे दिसतात. ग्रामीण भागाचं चित्रीकरण आलं असलं तरी त्यात शेतकरी फारसा दिसत नाही, समाजाला काही विचार-मूल्य देणे, रंजन करणे आणि सामाजिक बांधिलकी हे साहित्याचे उद्देश मानले तर मराठी साहित्य त्या कसोटीवर कुठे उभे आहे याचा विचार करायला हवा,’’ असेही वसुंधरा काशीकर म्हणाल्या.  उद्घाटनाचे प्रास्ताविक बीजभाषण करताना संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले, की शेतीच्या वेदनांवर हजारो वर्षांपासून कुणी बोललेच नाही. आजचा प्रतिष्ठित व नामवंत लेखक जर आजही पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेवर बोलताच झाला नसेल, त्यांना शेतीचे मूलभूत समस्याच कळाल्या नसेल तर आजचा शेतीसाहित्यिकाही मुकाच आहे आणि त्याचे डझनभर पुस्तके सुद्धा मुकीच आहेत.  संमेलनाचे उद्घाटन शेतकरी नेत्या सरोज काशीकर यांनी केले सूत्रसंचालन केले. लक्ष्मी बल्की व राजेंद्र झोटींग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com