Agriculture news in Marathi When will Takari's water use organization be set up? | Agrowon

‘ताकारी’च्या पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार?

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. ताकारी योजनेत सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र असून वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज या तालुक्यांचा समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणी पट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ७२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. ७२ संस्थांसाठी अधिसूचना १ व २ मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी अधिसूचना ३ असलेल्या पाणी वापर संस्थांची संख्या ५८ इतकी आहे.

सध्या २८ पाणी वापर संस्थांसाठी निवडणूक झाली असून त्यांचे संचालक मंडळही स्थापन झाले आहे. मात्र, उर्वरित पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. परंतु या संस्थांकडे क्षेत्र हस्तांतरित केलेले नाही.

पाणी वापर संस्थेचे कामकाज
पाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.

ताकारी उपसा सिंचन योजनेवरील ७२ पाणी वापर संस्था असून त्यापैकी २८ संस्थांच्या निवडणुका घेऊन संचालक मंडळ स्थापन केल्या आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याबाबत शेतकऱ्यांबाबत बैठक घेतली नाही. त्यामुळे उर्वरित पाणी वापर संस्थांची स्थापना राहिली आहे. लवकर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातील.
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...