संहितेत नसलेले शब्द आले कुठून? खासदार अशोक चव्हाण

संहितेत नसलेले शब्द आले कुठून? खासदार अशोक चव्हाण
संहितेत नसलेले शब्द आले कुठून? खासदार अशोक चव्हाण

औरंगाबाद : सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारची येत्या निवडणुकीत उचलबांगडी निश्चित आहे. दुष्काळ घोषित केला म्हणजे झालं का? शिवाय दुष्काळ गंभीर व मध्यम कसा असू शकतो. संहितेत कुठेही असे शब्द नाहीत. मग दुष्काळसदृ‍श, गंभीर वा मध्यम दुष्काळ असे शब्द आले कुठून, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

औरंगाबाद येथे १८ जिल्ह्यांतून फिरून आलेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेपूर्वी श्री. चव्हाण यांनी गुरुवारी (ता. १) पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. चव्हाण म्हणाले की, जनतेत सरकारविषयी प्रचंड असंतोष आहे. तो असंतोषच सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरेल. मुख्यमंत्री आषाढी पूजेला जाऊ शकत नाहीत. मंत्री दिवसा दुष्काळाची पाहणी करू शकत नाहीत, याला काय म्हणायचे. काँग्रेसने सातत्याने आवाज उठविल्याने शासनाने कर्जमाफी व दुष्काळ जाहीर करण्याची तसदी घेतली. महसूल संहितेत दुष्काळसदृश, गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ असे शब्दच नाहीत. सरकारकडे उपाययोजना करण्यासाठी तरतूद नाही. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करते आहे, असे दिसते. दुष्काळ घोषित केला म्हणजे झालं, असं नाही. त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची तरतूद कशी ते शासन निर्णयात दिसत नाही. बोंडअळीचे पैसे नाही, कर्जमाफीचे पैसे नाही, नव्याने कर्ज नाही, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भरलेल्या विम्यापेक्षा मिळालेला परतावा हास्यास्पद आहे. गारपीट, बोंड अळीची मदत नाही, कर्जमाफीचं कोडं सुटलेल नाही, ५० टक्‍केही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही, अशी अवस्था आहे.

 या वेळी काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जून खरगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, हर्षवर्धन पाटील, सचिन सावंत आदींची उपस्थिती होती. फसवेगिरीविरुद्ध शेवटची घंटा उपस्थित सर्वच काँग्रेस नेत्यांनी वाजविली. पत्रकार परिषदेपूर्वी शासनकर्त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने स्थिती याविषयी काँग्रेसकडून संकलित चित्रफितही दाखविण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com