Agriculture news in marathi Where To Keep Since There Is No Ready Currant Box? | Agrowon

तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे? 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपिंग ऑईल, कार्बोनेट आणि बेदाणा भरण्यासाठी लागणारे बॉक्स उपलब्ध होत नसल्याने तयार झालेला बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न बेदाणा उत्पादक आणि बेदाणा शेड मालकांना पडला आहे. 

सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपिंग ऑईल, कार्बोनेट आणि बेदाणा भरण्यासाठी लागणारे बॉक्स उपलब्ध होत नसल्याने तयार झालेला बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न बेदाणा उत्पादक आणि बेदाणा शेड मालकांना पडला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहे. यंदाच्या हंगामात सुमारे अडीच ते ३ हजार बेदाणा शेड सुरू झाले आहेत. प्रत्येक बेदाणा शेडवर अंदाजे २५० चे ३०० टन बेदाणा तयार केला जातो. गेल्या पंधरा दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक उद्योग बंद झाले आहेत. त्याचा फटका बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेड मालकांना देखील बसला आहे. 

राज्यात संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपिंग ऑईल, कार्बोनेट यासह अन्य साहित्य मिळत नसल्याने द्राक्ष रॅकवर पडून आहेत. सध्या बेदाणा तयार करणाऱ्यांकडे साहित्य असले तरी ते काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे डिपिंग ऑईल, कार्बोनेट मिळाले नाही तर बेदाणा तयार होणार नाही. 

सध्या हजारो टन बेदाणा तयार झाला आहे. तो बेदाणा कशात साठवणूक करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॉक्स तयार करण्याच्या कंपन्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे बॉक्स कुठेही उपलब्ध होत नाही. बेदाणा बॉक्स विना तसा पडून आहे. जिल्हा प्रशानाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

अडवणूक थांबली
मागील दोन दिवसांपासून बेदाणा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची पोलिसांकडून अडवणूक केली जात होती. परंतू आम्ही जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा याखाली नोंदणी केली आहे. त्यामुळे बेदाणा वाहतूक अडवली जात नाही.

बेदाणा ठेवण्यासाठी बॉक्स मिळत नाहीत. त्यामुळे बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न पडला आहे. शासनाने बॉक्स तयार करणाऱ्या कंपन्या सुरू करुन आम्हाला बॉक्स उपलब्ध करुन द्यावेत.
- सुनील माळी, बेदाणा उत्पादक आणि शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...