Agriculture news in Marathi, while the animals of the 4 villages are in Satara | Agrowon

...तर ३२ गावांची जनावरे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोडणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यातील कुकुडवाड, पुकळेवाडीसह १६ गावे व खटाव तालुक्‍यातील कलेढोण, विखळेसह १६ गावांना टेंभू उपसा योजनेतून पाणी देण्याचा निर्णय एक महिन्यात झाला नाही, तर ३२ गावांतील जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा निर्णय रविवारी कुकुडवाड (ता. माण) येथे झालेल्या पाणी परिषदेत घेण्यात आला. 

माण-खटावमधील ३२ वंचित गावांतील ग्रामस्थांच्या टेंभू उपसा पाणी परिषदेसाठी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, परिषदेचे संयोजक सदस्य विठ्ठल काटकर आदी उपस्थित होते. 

कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यातील कुकुडवाड, पुकळेवाडीसह १६ गावे व खटाव तालुक्‍यातील कलेढोण, विखळेसह १६ गावांना टेंभू उपसा योजनेतून पाणी देण्याचा निर्णय एक महिन्यात झाला नाही, तर ३२ गावांतील जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा निर्णय रविवारी कुकुडवाड (ता. माण) येथे झालेल्या पाणी परिषदेत घेण्यात आला. 

माण-खटावमधील ३२ वंचित गावांतील ग्रामस्थांच्या टेंभू उपसा पाणी परिषदेसाठी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, परिषदेचे संयोजक सदस्य विठ्ठल काटकर आदी उपस्थित होते. 

या वेळी गोरे म्हणाले, ‘‘माझ्या मतदारसंघात पाणी आल्याशिवाय पाण्याचा एकही थेंबही पुढे जाऊ देणार नाही. ही माझी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे. जो काय निर्णय घ्याचा तो घ्या. परंतु, दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवून कुणी पाणी नेणार असेल व आमच्या पाण्यावर कुणी हक्क सांगत असेल, तर प्रसंगी कॅनॉल तोडून कायदा हातात घेऊ.’’

देशमुख म्हणाले, ‘‘भागाला पाणी मिळण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करीत आहे. कशा पद्धतीने या गावाच्या शिवारात पाणी आणता येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ३२ गावांना पाणी मिळण्यासाठी या पुढे जी आंदोलने होतील, त्या वेळी मी तुमच्याबरोबर असेन.’’ देसाई म्हणाले, ‘‘३२ गावांना पाणी देण्यास वचनबद्ध आहे. मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माण व खटाव तालुक्‍यांतील वंचित गावांना पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी देण्याचा शब्द दिला आहे.’’ काटकर म्हणाले, ‘‘पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ३२ गावांत आज लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. या भागाला पाणी मिळाले नाही, तर भविष्यात लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही.’’ ३२ गावांतून हजारो नागरिक व महिला पाणी परिषदेस उपस्थित होत्या. विठ्ठल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी काटकर यांनी आभार मानले.

चितळीतील जलसेतूत समाधी 
पाणी परिषदेत दोन ठराव घेण्यात आले. पहिला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात ३२ गावांतील जनावरे सोडण्याचे आंदोलन आणि दुसरे आंदोलन हे चितळी येथील जलसेतूमध्ये ३२ गावांतील महिला व पुरुषांकडून जलसमाधीचे असेल. त्याला शासन व प्रशासन जबाबदार असेल. शासन व प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देऊन आंदोलनाच्या तारखा टेंभू पाणी योजना संघर्ष समिती निश्‍चित करून निवेदन देईल.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...