कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव
माझ्याकडील ५० गुंठे ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांत तुटणारा ऊस वाळून जाऊ लागला आहे. नदी काठच्या परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आहे. आमच्या परिसरातील हुमणीने बाधित झालेला ऊस शेतकरी चाऱ्यासाठी पाठवत आहेत.
- सचिन जाधव, काशीळ, जि. सातारा.
सातारा ः जिल्ह्यातील पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊस पिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके कमी अधिक स्वरूपात हुमणीच्या विळख्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल व कमी पावसामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात खरीप पिकांची १०० टक्क्यांवर पेरणीची कामे उरकली आहेत. पेरणी झालेल्या पिकांपैकी भात, भूईमुगासह आले व ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे या पिकांवर प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पीक पिवळे पडणे, रोपांना मर लागणे ही लक्षणे हुमणीमुळे दिसून येत आहेत. नदी काठच्या क्षेत्रावरील पिकांत हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. अगदी पाच ते सहा फुट उंचीचे ऊस पीक हुमणीच्या प्रादुर्भावाने एेन पावसाळ्यात वाळत आहेत. आले पिकात वाढलेल्या हुमाणीच्या प्रादुर्भावामुळे कंदकुज होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून आळवण्या केल्या जात आहेत.
नुकत्याच लागवड झालेल्या आडसाली उसातही हुमणीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कीड नियंत्रणात येत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. किडी नियंत्रण करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
या गावात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेथे हुमणी व्यवस्थापनासाठी कृषी विभागाकडून बैठकीचे अायोजन सुरू केले आहे. या बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी दिली.
सोयाबीनही विळख्यात
जिल्ह्यात मागील सात ते आठ वर्षांपासून सोयबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेल्याने खरिपातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीन पिकातही हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- 1 of 584
- ››