Agriculture news in marathi; Who is the deputy chairman of the Jalgaon Market Committee? | Agrowon

जळगाव बाजार समितीत उपसभापतिपदी वर्णी कुणाची?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी चौघे इच्छुक असून, कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी चौघे इच्छुक असून, कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यात जळगाव बाजार समिती सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या बाजार समितीमध्ये काही दिवसांपूर्वी सभापतिपदाची निवड झाली आहे. आता या महिन्याच्या अखेरिस उपसभापती यांची निवड होईल. त्यासंबंधी विशेष सभेचे आयोजन केले जाईल. उपसभापतिपदी भाजप व शिवसेना समर्थकाची नियुक्ती निश्‍चित मानली जात आहे. त्यात भाजप समर्थक मनोहर पाटील, प्रभाकर पवार, सुरेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना समर्थकांमधून वसंत भालेराव यांचे नाव चर्चेत आहे. भालेराव यांनी उपसभापतिपद यापूर्वीच भूषविले आहे. तर मनोहर पाटील यांनादेखील सुमारे वर्षभर उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे. 

उपसभापतिपदासंबंधीच्या निवडीचे अधिकार नेत्यांकडे संचालकांनी दिले आहेत. यामुळे नेते यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सभापती निवडीच्या वेळेस सर्व संचालक एकत्र आले होते. यामुळे आता उपसभापतिपदाची निवडदेखील बिनविरोध किंवा सर्व संचालकांच्या संमतीने होईल, असे सांगितले जात आहे. या पदासाठी इच्छुकांनी संचालकांचे समर्थन व नेत्यांची मर्जी मिळविण्यासंबंधी प्रयत्न सुरू केले असल्याचे चित्र आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...