agriculture news in Marathi WHO launched corona app Maharashtra | Agrowon

मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची माहिती

वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संदर्भात माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अॅप प्रसारीत केले आहे.

जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संदर्भात माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अॅप प्रसारीत केले आहे. या ‘माय हेल्थ अॅप’मध्ये अधिकृत माहितीसह स्वयंनिदान सहाय्य आणि अन्य लोकांपर्यंतचा होणारा विषाणूंचा प्रसार रोखण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. 

सध्याचा चीन येथील वुहानमधून जगभरातील सुमारे ७० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊनसह संचारबंदी करण्यात आली आहे. सध्याच्या माहितीच्या युगामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्याविषयी खऱ्या खोट्या बातम्या, तथ्ये येत आहेत.

लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरण्यास मदत होत आहे. हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने सुरुवातीला संघटनेच्या वॉटस्अॅप, चॅटबोट मार्फत प्रयत्न केले होते. या प्रयत्नांमध्ये अधिक नियमितता आणि अधिकृतता आणण्यासाठी संघटनेने मायहेल्थ अॅप तयार केले असून त्याचे प्रसारण सोमवारी (ता. ३०) केले आहे. 

खोट्या माहितीच्या प्रसाराला लगाम घालण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरेल. आता आयफोन, अॅण्ड्रॉईड आण वेबबेस अशा नवीन अॅपद्वारे लोकांना योग्य ती माहिती उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये आपल्या लोकेशननुसार कोरोनो संशयित व्यक्तींची संख्या, बाधितांची संख्या आणि आवश्यक ती माहिती त्वरीत उपलब्ध होते. या पहिल्या व्हर्जनमध्ये लक्षणांवरून स्वतःचे निदान करणे शक्य होणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला त्वरीत साह्य देणे शक्य होईल.

सुधारीत अॅपमध्ये अधिक फिचर्स
सध्या हे पहिले व्हर्जन असून, भविष्यामध्ये या अॅपचे आणखी सुधारीत व्हर्जन आणण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे विशिष्ठ समुदायामध्ये नेमक्या कशा प्रकारे रोगाचा प्रसार होत गेला याचीही माहिती उपलब्ध होईल. यामध्ये परवानगी घेतल्यानंतर आपल्या मोबाईलच्या लोकेशनवरून आपण कोणत्या रोगप्रसारीत क्षेत्रामध्ये किंवा बाधित व्यक्तींच्या नजीक असल्याबाबतही इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अर्थात, यासाठी आपल्या परवानगीने मोबाईलच्या लोकेशनची गुगल मॅप सोबत सांगड घालण्यात येईल. सोबतच आपल्या प्रवासाचा संपूर्ण इतिहास त्यात नोंदवून ठेवलेला असेल. भविष्यामध्ये अतितीव्र संसर्गजन्य आजाराच्या प्रसारावर वेळीच मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला या माहितीचा उपयोग होऊ शकेल. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...