Agriculture news in Marathi, Who will be chosen as Director of Marketing? | Agrowon

पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालनालयाला नवीन सरकार पूर्णवेळ संचालक देणार का? हे नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होत आहेत. तर या पदासाठी अपर आयुक्त सतीश सोनी आणि डॉ.

पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालनालयाला नवीन सरकार पूर्णवेळ संचालक देणार का? हे नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होत आहेत. तर या पदासाठी अपर आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड पात्र असून, पणन सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सनदी अधिकाऱ्यांची देखील नियुक्तीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पणन संचालक हे पद अपर आयुक्त दर्जाचे असून, सध्या सहकार विभागात सतिश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड हे दोन अधिकारी अपर आयुक्त दर्जाचे आहेत. सोनी यांच्याकडे सध्या सहकार आयुक्तांचा प्रभारी आणि मुंबई बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार आहे. तर डॉ. जोगदंड अपर आयुक्त म्हणून सहकार आयुक्तालयात कार्यरत आहेत. डॉ. जोगदंड यांनी यापूर्वी पणन संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, पणन संचालकपदी सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे धोरण राज्य सरकारने अवलंबिल्याने डॉ. जोगदंड यांची सहकार आयुक्तालयात बदली करून, त्यांच्या जागी दीपक तावरे यांची पणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांतच तावरे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर पणन संचालकपदी डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान डॉ. तोष्णीवाल नोव्हेंबरअखेर सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सहकार आणि पणन विभागाचे लक्ष लागले आहे. 

पणन संचालकपदाच्या शर्यतीत विद्यमान प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शेतमाल विपणनाची व्याप्ती आणि केंद्र शासनाचे पणन सुधारणांचा आग्रह यासाठी या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनांची मागणी आहे. 

सोनी यांच्याकडे मुंबई बाजार समिती आणि सहकार आयुक्त अशी दुहेरी जबाबदारी असून. त्यांना पूर्णवेळ पणन संचालकपदी नियुक्ती देताना आताचे दोन्ही पदभार सोडावे लागणार आहे. सोनी यांना सध्याच्या दोन्ही पदांना न्याय देताना मुंबई - पुणे अशी ओढाताण होताना दिसत आहे. तर डॉ. जोगदंड पुन्हा पणन संचालकपदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे पणन संचालकपदी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ पणन संचालकांची गरज
शेतमालाच्या पारंपरिक विपणन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकार विविध पणन सुधारणा करत आहे. यामध्ये संपूर्ण नियमनमुक्ती, ई नाम, इलेक्ट्रॉनिक व्यापार, राष्ट्रीय बाजार, संपूर्ण नियमनमुक्ती आदी क्लिष्ट बदलांच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच फळे भाजीपाल्याच्या नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहता, चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्तीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. या पदासाठी पणन संचालकपदाचा अनुभव असलेले आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...