Agriculture news in Marathi, Who will be chosen as Director of Marketing? | Page 2 ||| Agrowon

पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालनालयाला नवीन सरकार पूर्णवेळ संचालक देणार का? हे नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होत आहेत. तर या पदासाठी अपर आयुक्त सतीश सोनी आणि डॉ.

पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालनालयाला नवीन सरकार पूर्णवेळ संचालक देणार का? हे नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होत आहेत. तर या पदासाठी अपर आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड पात्र असून, पणन सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सनदी अधिकाऱ्यांची देखील नियुक्तीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पणन संचालक हे पद अपर आयुक्त दर्जाचे असून, सध्या सहकार विभागात सतिश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड हे दोन अधिकारी अपर आयुक्त दर्जाचे आहेत. सोनी यांच्याकडे सध्या सहकार आयुक्तांचा प्रभारी आणि मुंबई बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार आहे. तर डॉ. जोगदंड अपर आयुक्त म्हणून सहकार आयुक्तालयात कार्यरत आहेत. डॉ. जोगदंड यांनी यापूर्वी पणन संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, पणन संचालकपदी सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे धोरण राज्य सरकारने अवलंबिल्याने डॉ. जोगदंड यांची सहकार आयुक्तालयात बदली करून, त्यांच्या जागी दीपक तावरे यांची पणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांतच तावरे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर पणन संचालकपदी डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान डॉ. तोष्णीवाल नोव्हेंबरअखेर सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सहकार आणि पणन विभागाचे लक्ष लागले आहे. 

पणन संचालकपदाच्या शर्यतीत विद्यमान प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शेतमाल विपणनाची व्याप्ती आणि केंद्र शासनाचे पणन सुधारणांचा आग्रह यासाठी या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनांची मागणी आहे. 

सोनी यांच्याकडे मुंबई बाजार समिती आणि सहकार आयुक्त अशी दुहेरी जबाबदारी असून. त्यांना पूर्णवेळ पणन संचालकपदी नियुक्ती देताना आताचे दोन्ही पदभार सोडावे लागणार आहे. सोनी यांना सध्याच्या दोन्ही पदांना न्याय देताना मुंबई - पुणे अशी ओढाताण होताना दिसत आहे. तर डॉ. जोगदंड पुन्हा पणन संचालकपदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे पणन संचालकपदी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ पणन संचालकांची गरज
शेतमालाच्या पारंपरिक विपणन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकार विविध पणन सुधारणा करत आहे. यामध्ये संपूर्ण नियमनमुक्ती, ई नाम, इलेक्ट्रॉनिक व्यापार, राष्ट्रीय बाजार, संपूर्ण नियमनमुक्ती आदी क्लिष्ट बदलांच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच फळे भाजीपाल्याच्या नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहता, चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्तीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. या पदासाठी पणन संचालकपदाचा अनुभव असलेले आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्यावर ठाम...मुंबई : महिन्याला १०० युनिटपर्यंत वीज वापर...
उंबरशेत खाडी किनाऱ्यावरील शेतजमीन झाली...मंडणगड, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील उंबरशेत...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
थंडी वाढण्यास अनुकूल हवामान या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऊसदराकडे साताऱ्यातील शेतकऱ्यांचे डोळेसातारा  : जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांचा...
ग्रामपंचायत निवडणूक नव्याने जाहीर होणारमुंबई : राज्यभरातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या...
दापोडे येथे उसाला शॉर्टसर्किटमुळे आगवेल्हे,  जि. पुणे ः तालुक्‍यातील दापोडे...
मोहरीत मादी बिबट्या दोन बछड्यांसह...नगर : तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर व दोन...
उस्मानाबादमध्ये रब्बीसाठी सात टक्के पीक...उस्मानाबाद  :  खरीप हंगामामध्ये अत्यंत...
नांदेडमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच...नांदेड : जिल्ह्यातील आगामी काळात सार्वत्रिक...
जळगाव जिल्ह्यात गहू पेरणीला वेगजळगाव  : जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र यंदा...
अकोल्यात रब्बीसाठी सव्वीस हजार हेक्टरवर...अकोला : यंदाच्या मोसमात झालेल्या पावसामुळे...
‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेतून भरीत वांगी...जळगाव : ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शहरात...
बियाणे खरेदी करण्यापूर्वी उपलब्धतेबाबत...नाशिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रब्बी...
राजुरा बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदी...राजुरा  :  कृषी उत्पन्न बाजार समिती...
सातबारा संगणकीकरण, डिजिटायझेशन...नाशिक : जिल्ह्यातील १ हजार ९७८ महसूल गावांपैकी १...
वाळवा तालुक्‍यात ‘लाळ खुरकूत’ची ७० हजार...इस्लामपूर, जि. सांगली  : संभाव्य लाळ खुरकूत...
शेतातील विद्युत टॅावरचा मोबदला आठ...सोलापूर  : सिद्धापूर, तांडूर गावातील...
सांगलीत एफआरपीबाबत ऊस उत्पादकांत साशंकतासांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी...