agriculture news in marathi, Who will be Maharashtras Smart Farmer, AGROWON AWARDS 2019 | Agrowon

कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी? आज शानदार कार्यक्रमात होणार घोषित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 मे 2019

पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना आज (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डस प्रदान केले जाणार आहेत.  मात्र, कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आज होणाऱ्या रंगतदार कार्यक्रमात याची घोषणा होणार आहे. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. 

पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना आज (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डस प्रदान केले जाणार आहेत.  मात्र, कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आज होणाऱ्या रंगतदार कार्यक्रमात याची घोषणा होणार आहे. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. 

पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या रंगतदार पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे, मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र आदी आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे विजयश्री इव्हेंटस्‌ हे प्रस्तुतकर्ते आहेत.

काळ्या माती राबणाऱ्या हातांना पुरस्काराचाही स्पर्श आणि पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे पाहिजे, अशी भूमिका ठेवत अॅग्रोवन परिवाराने सुरू केलेल्या स्मार्ट अॅवार्डस वितरण परंपरेचे हे तिसरे वर्ष आहे. अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्डसकडे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे प्रायोजक रिहुलीस, निरामय अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, बोअर चार्जर, महारयत अॅग्रो इंडिया, सिस्टिमा बायो, मारुती सुझुकी सुपर कॅरी हे आहेत.

यंदाचे अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड एकूण १३ श्रेणींमध्ये दिले जात आहेत. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून प्रस्ताव आले होते.  तज्ज्ञांच्या समावेश असलेल्या निवड समितीकडून या प्रस्तावांची छाननी व निवड करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. प्रत्येकी २५ हजारांचा अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार या वेळी दिला जाईल. 

यंदा ‘अॅग्रोवन’कडून ‘जलव्यवस्थापन वर्ष’ साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने प्रथमच ‘स्मार्ट जलव्यवस्थापक पुरस्कार’ दिला जाणार आहे. याशिवाय ‘अॅग्रोवन स्मार्ट संशोधक पुरस्कार’ देखील संशोधक वृत्तीने शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला दिला जात आहे. सेंद्रिय शेतीत कर्तृत्व गाजवलेल्या शेतकऱ्याला ‘अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार’ दिला जाईल. याशिवाय अॅग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार, अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण) विजेत्या शेतकऱ्यांना प्रत्येक दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र दिले जाणार आहे.

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...