Agriculture news in marathi The whole country was shaken by the tragedy in Nashik | Agrowon

नाशिकच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख मान्यवरांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना शोकाकूल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख मान्यवरांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना शोकाकूल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे या अपघातात बळी पडलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्रातील नाशिक येथे रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना व्यथित करणारी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या शोकाकूल कुटुंबीयांप्रती सहवेदना, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. तसेच इतर सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही राष्ट्रपतींनी केली. तर उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी या शोकाकूल वातावरणात आपल्या प्रार्थना दिवंगत रुग्णांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, अशा शब्दांत सांत्वना व्यक्त केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेमुळे आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली. ऑक्सिजन सिलिंडर गळतीमुळे नाशिकच्या रुग्णालयात घडलेली शोकांतिका हृदय पिळवटून टाकणारी आहे. यातील जीवितहानी व्यथित करणारी असून, या दुःखाच्या प्रसंगात शोकाकूल कुटुंबीयांप्रती आपण सांत्वना व्यक्त करतो, असे भावनात्मक ट्विट पंतप्रधानांनी केले. 

दरम्यान, कोरोना संसर्ग झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटद्वारे शोकाकूल कुटुंबीयांची सांत्वना व्यक्त करताना सर्वतोपरी मदतीसाठी महाराष्ट्र सरकारला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले. नाशिकच्या झाकिर हुसेन रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची बातमी मन हेलावणारी आहे. शोकाकूल कुटुंबीयांप्रती सहवेदना. राज्य सरकार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी साह्य करावे, असे मी आवाहन करतो, असे ट्विट राहुल गांधींनी केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...